OTT 
मनोरंजन

OTT: मार्चमध्‍ये मनाेरंजनाची मेजवानी; ‘ओटीटी’वर प्रदर्शित होणार ‘या’ वेब सीरिज

backup backup
पुढारी ऑनलाईन

कोरोना काळात 'ओटीटी' (OTT) हे मनोरंजनाच केंद्रबिंदू झालं.'ओटीटी'वरील  वेब सीरिज आणि चित्रपटांना चाहत्‍यांनी पसंती मिळाली.   मोठ-मोठे बॅनर्स देखील त्यांच्या चित्रपट प्रदर्शित करण्‍यासाठी 'ओटीटी' पर्यायाचा विचार करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाले. मार्चमध्‍ये प्रेक्षकांना मनाेरंजनाची मेजवानी मिळणार असून 'ओटीटी'वर पाच  वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

मार्चमध्‍ये प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज

रुद्र : द एज ऑफ डार्कनेस
ओटीटी प्लेटफार्म- डिज्नी+ हॉटस्टार
रिलीज डेट – १ मार्च २०२२

'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' ही एक क्राइम थ्रीलर वेब सीरिज आहे. अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका एका गुप्तहेराची कथा आहे. या मालिकेचे एकूण चार भाग प्रदर्शित होणार आहेत.

अंदेखी सीझन २
ओटीटी प्लॅटफॉर्म- सोनी लाइव्ह
प्रकाशन तारीख – ४ मार्च २०२२

'अंदेखी' ही क्राईम थ्रीलर वेब सीरिज सोनी लाइव्हवर प्रदर्शित झाली होती. आता त्याच्या दुसऱ्या सीझनमध्ये डीएसपी घोष (दिव्येंदू भट्टाचार्य) आणि तेजी (आंचल सिंग) कोयल (अपेक्षा पोरवाल) रिंकू (सूर्य शर्मा) पासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतील. ज्यांना गुन्हेगारी आणि थ्रीलर प्रकार आवडतात त्यांच्यासाठी ही एक मनोरंजक मालिका ठरू शकते.

बेटर थिंग्स सीजन 5
ओटीटी प्लेटफार्म- डिज्नी+ हॉटस्टार
प्रकाशन तारीख- मार्च 1, 2022

'बेटर थिंग्ज' हा एक कॉमेडी-ड्रामा आहे, ज्याच्या या सीझनमध्ये पामेला ऑडलॉन, मिकी मॅडिसन, हॅना रिले, ऑलिव्हिया एडवर्ड्स, सेलिया एमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या कथेत एका आईचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

डीयर.सीजन 2
ओटीटी प्लेटफार्म- एप्पल टीवी+
प्रकाशन तारीख- 4 मार्च 2022

हा शो लोकप्रिय सेलिब्रिटींच्या जीवनाचा मागोवा घेतो जे नकळतपणे अनेकांच्या जीवनावर प्रभाव टाकतो. दुसऱ्या सीझनमध्ये एकूण 10 भाग असतील, ज्यात व्हायोला डेव्हिस, मलाला युसुफझाई, जेन फोंडा आणि अवा डुवर्ने यांच्‍या जीवनाचा मागाेवा घेण्‍यात आला आहे.

पीसज ऑफ हर
ओटीटी प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स
प्रकाशन तारीख- ४ मार्च २०२२

'पीसेस ऑफ हर'ची कथा करिन स्लॉटरच्या २०१८च्या कादंबरीवर आधारित आहे. ही एक क्राइम आणि थ्रिलरवर आधारित वेब सीरिज असेल. या मालिकेत एका लेथल मॅनच्या शूटिंगमध्ये अडकलेल्या महिलेची कथा दाखवण्यात आली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT