Dharmendra not tribute in oscars 2026 indian fans angry  instagram
मनोरंजन

Oscar Awards 2026: 'ही-मॅन' धर्मेंद्र यांना श्रद्धांजली देण्यास विसरली अ‍ॅकॅडमी, 'इन मेमोरिअम'मध्ये नाव नसल्याने फॅन्सचा संताप

Oscar Dharmendra | ऑस्करमध्ये धर्मेंद्र यांची आठवण देखील नाही, श्रद्धांजली न वाहिल्याने भारतीयांचा संताप

स्वालिया न. शिकलगार

लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या ९८ व्या ऑस्कर सोहळ्यात सिनेसृष्टीतील दिवंगत कलाकारांना 'इन मेमोरिअम' विभागात श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, या यादीतून बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव गायब असल्याने भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. धर्मेंद्र यांनी भारतीय सिनेमात दिलेल्या सहा दशकांच्या योगदानाची दखल ऑस्करने घेतली नसल्याने नेटकऱ्यांनी अ‍ॅकॅडमीवर टीकेची झोड उठवली आहे.

Dharmendra not tribute in oscars 2026 indian fans angry

जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ९८ व्या ऑस्कर (Academy Awards 2026) सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्यात यंदा 'इन मेमोरिअम' (In Memoriam) या विभागात गेल्या एका वर्षात जगाचा निरोप घेणाऱ्या दिग्गज कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पण, या यादीत भारताचे महान अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे नाव नसल्याचे पाहून भारतीय प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. अनेक हॉलिवूड दिवंगत अभिनेत्यांची नावे या यादीत होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

ऑस्कर सोहळ्याच्या एका भागात सिनेसृष्टीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आणि अलीकडेच निधन पावलेल्या दिग्गजांची आठवण काढली जाते. यंदा या विभागात हॉलिवूडच्या अनेक मोठ्या नावांचा समावेश होता. मात्र, बॉलिवूडचे 'ही-मॅन' आणि तब्बल ३०० हून अधिक चित्रपटांत काम करणाऱ्या धर्मेंद्र यांची दखल ऑस्करने घेतली नाही. मागील वर्षी धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण भारत हळहळला होता, पण जागतिक मंचावर त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.

बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांना देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे फॅन्स प्रतीक्षा करत होते. पण ऑस्करमध्ये असं काही झालं नाही. आपल्या 'इन मेमोरियम' सेगमेंटमध्ये ॲकॅडमी ऑस्करने बॉलीवूडच्या कोणत्याही कलाकाराला श्रद्धाजली वाहिली नाही. ऑस्करच्या सोहळ्यात ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. याआधी भारतीय दिग्गजांनाही ऑस्करच्या मुख्य सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्यावेळीही मोठा वाद निर्माण झाला होता.

बॉलीवूडचे 'ही-मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले. त्यांनी ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडी अशा तिन्ही शैलींत स्वतःचा ठसा उमटवला. शोले, फूल और पत्थर, अनुपमा, प्रतिज्ञा, सीता और गीता, मेरा गाव मेरा देश, यमला पगला दीवाना, रॉकी और रानी की प्रेम कहानी, सत्यकाम, चुपके चुपके, धरम वीर असे गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT