अनेक मालिकांमध्ये प्रेक्षकांना दिसलेला ओळखीचा चेहरा म्हणजे नूपुर अलंकार. अनेक मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री एकाएकी लाईम लाइटपासून लांब गेली. तिचे जाणे कुणाच्या लक्षातही आले नाही इतक्या सहज ती मनोरंजन विश्वापासून लांब गेली. (Latest Entertainment News)
नूपुरने एका मुलाखतीमध्ये तिच्या सध्याच्या आयुष्याचा खुलासा केला आहे. नूपुर त्यात म्हणते, ‘पीएमसी बँक स्कॅमपासून या सगळ्याला सुरुवात झाली. या धक्क्याने माझी आई आजारी पडली. तिच्या उपचारासाठी पैसे कमी पडले. नंतर माझ्या बहिणीचाही मृत्यू झाला. यामुळे माझी सांसारिक आयुष्यातील आवड कमी झाली. माझ्या जवळच्या लोकांचा मी निरोप घेतला आणि अध्यात्माकडे माझा ओढा वाढला.
नूपुर पुढे म्हणते अध्यात्माच्या वाटेवर चालल्याने गोष्टी सोप्या झाल्या. माझे खर्च कमी झाले. या वाटेवर चालताना माझे खर्च कमी झाले. कधी कधी मला भिक्षाही मागावी लागते. ही भिक्षा मी गुरु आणि ईश्वराला देते. अहंकार कमी होतो. मी चार ते पाच जोडी कपड्यातच असते. जे लोक आश्रमात येतात ते कपडे आणि इतर वस्तु देतात तेच खूप आहेत.
नूपुरने 2022 मध्ये संन्यास घेतला होता. 20 वर्षांचे लग्नाचे नातेही तिने यावेळी हे जीवन स्वीकारण्यासाठी मागे टाकले होते. संन्यासी जीवनात नूपुरला पहिल्यांदा सहा लोकांनी भिक्षा दिली होती.
शक्तिमान, दिया और बाती हम, राजा जी, घर की लक्ष्मी बेटियां या मालिकांमध्ये नूपुर दिसली होती. सोनाली केबल आणि सावरिया या सिनेमांमध्येही नूपुर दिसली होती.