Nora Fatehi sarke chunari Song Row: instagram
मनोरंजन

Nora Fatehi sarke chunari Song Row: नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ, राष्ट्रीय महिला आयोगाने 'केडी : द डेविल'च्या टीमला जारी केलं समन

Nora Fatehi sarke chunari Song Row:नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ, राष्ट्रीय महिला आयोगाने 'केडी : द डेविल'च्या टीमला जारी केलं समन

स्वालिया न. शिकलगार

मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटाचा दमदार फर्स्ट लूक टीझर आता चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, आज १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटासोबत हा टीझर दाखवण्यात येत आहे.

Nora Fatehi Nora Fatehi sarke chunari Song Row - National Commission for Women (NCW) has issued summons

नोरा फतेही, संजय दत्त आणि चित्रपट निर्मात्यांना समन राष्ट्रीय महिला आयोगाने समन जारी केलं आहे. केडी: द डेविल चित्रपटातील गाणे सरके चुनरी आक्षेपार्ह ठरले. गाण्यातील बोल आणि दृस्यांवरून झालेल्या वादानंतर हे गाणे सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले. तसेच नोराने एक व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरणही दिले. शिवाय, लोकसभेतही या गाण्यावरून गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि अधिकृतपणे या गाण्यावर बंदी घातल्याचे सांगण्यात आले.

आता राष्ट्रीय महिला आयोगाने बॉलीवूड अभिनेता संजय दत्त, डान्सर नोरा फतेही, कन्नड चित्रपट केडी: द डेविलच्या टीमला समन जारी केलं आहे. ‘सरके चुनर तेरी सरके' गाण्यावरून मिळालेल्या तक्रारीनंतर आयोगाने हे पाऊल उचलले आहे.

तक्रारीनुसार, गाण्याचे बोल, कोरिओग्राफी आणि सीन अश्लील आहेत, जे खासकरून मुले आणि समाजासाठी नुकसान पोहोचणारे असू शकतात. हे प्रकरण सिनेमामध्ये क्रिएटिव फ्रीडम आणि कंटेंट कंट्रोल विषयी वाद उत्पन्न करत आहे. काही लोक ते केवळ एंटरटेनमेंट असल्याचे मानतात, तर दुसरीकडे, महिलांची प्रतिमा आणि नैतिकतेविरोधात कडक कारवाईची मागणी ते करत आहेत.

एनसीडब्ल्यूने या गाण्याशी संबंधित सर्व लोकांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तक्रारीनंतर पुढील कारवाईवर विचार करण्यात येणार आहे. केडी: द डेविल एप्रिल २०२६ मध्ये रिलीज होणार आहे. नोरा फतेहीने म्हटले की, तीन वर्षापूर्वी कन्नड व्हर्जनसाठी तिने गाणे शूट केलं होतं. ते हिंदी व्हर्जनमध्ये कसे रिलीज करण्यात आलं, याबद्दल तिला माहिती नाहिये.

गाण्याचे लेखक म्हणून रकीब आलम यांचे नाव दाखवण्यात येत आङे. पण ते स्वत: म्हणताहेत की, त्यांनी हे गाणं लिहिलं नाही. एका बातचीतमध्ये दिग्दर्शकाने त्यांना गाणे लिहिण्यासाठी सांगितले होते. पण वेळेचा अभाव असल्याचे सांगता त्यांना केवळ गाणे ट्रान्सलेट करण्यासाठी म्हटले गेले. निर्मात्यांनी त्यांना म्हटले की, केवळ भाषांतर करून द्या, ते फाईन ट्यून करून रिलीज केलं जाईल. पण तसे झाले नाही. गाणे जसे होते तसे रिलीज केलं गेलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT