Nora Fatehi on Middle East Conflict Pudhari
मनोरंजन

Nora Fatehi on Middle East: मध्यपूर्वेतील तणावावर नोरा फतेहीचा व्हिडिओ व्हायरल; म्हणाली, भारतात...

Nora Fatehi on Middle East Conflict: मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षावर नोरा फतेहीने प्रतिक्रिया देत लोकांनी शांततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. ती सध्या भारतात सुरक्षित असल्याचे सांगत, परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी शक्यता व्यक्त केली.

Rahul Shelke

Nora Fatehi Reacts to The Ongoing Middle East conflict: मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या ती भारतात सुरक्षित असल्याचे सांगत तिने शांतता आणि एकतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.

1 मार्च रोजी नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ती दुबईत वास्तव्यास असली तरी सध्या भारतात असल्याचे तिने स्पष्ट केले. व्हिडिओमध्ये बोलताना तिने सांगितले की, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या घडामोडींमुळे अनेकांच्या मनात भीती आहे.

“दररोज काय होणार, याची भीती लोकांच्या मनात आहे. जगात जे काही घडत आहे, ते पाहून मन अस्वस्थ होते. निरपराध लोकांचे जीव जाऊ नयेत, एवढीच इच्छा आहे,” असे ती म्हणाली.

“आपल्याला शांतता हवी”

नोरा पुढे म्हणाली की, गेल्या काही वर्षांत जगभरात सतत एकामागोमाग एक संकटे, संघर्ष आणि दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे लोक मानसिकदृष्ट्या थकले आहेत. “आपल्याला स्थैर्य आणि शांतता हवी आहे. जागतिक स्तरावर जे काही घडत आहे, त्यावर आपले नियंत्रण नाही. त्यामुळे प्रार्थना करणे आणि सकारात्मक राहणे आवश्यक आहे,” असे तिचे मत आहे.

“परिस्थिती आणखी गंभीर होईल”

व्हिडिओमध्ये तिने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सत्तासंतुलनात मोठे बदल होतील. कदाचित नव्या जागतिक व्यवस्थेची सुरुवात होईल. पण या सगळ्याची किंमत सामान्य लोकांना चुकवावी लागते, असे ती म्हणाली. तिच्या मते, अशा संघर्षांचा परिणाम केवळ राजकीय पातळीवर होत नाही, तर मानसिक आणि आर्थिक स्तरावरही त्याचा परिणाम होतो.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

नोरा फतेहीच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी तिच्या शांततेच्या आवाहनाचे समर्थन केले, तर काहींनी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटी आपापली भूमिका मांडताना दिसत आहेत. सध्याची परिस्थिती वेगाने बदलत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT