मनोरंजन

No Entry : ‘नो एंट्री’च्या सिक्वेलमध्ये सलमानसोबत 9 नायिका

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या वाढदिनी दिग्दर्शक अनिस बझ्मी यांनी त्यांच्या 'नो एंट्री' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली. सलमाननेही तो या कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू करत असल्याचे सांगितले. आता या चित्रपटात सलमान खानची तिहेरी भूमिका (ट्रिपल रोल) असणार आहे. याशिवाय अनिल कपूर आणि फरदीन खानदेखील ट्रिपल रोलमध्ये असणार आहेत.

नो एंट्री- No Entry 

मुख्य नायकांचे असे ट्रिपल रोल असल्याने 9 वेगवेगळ्या नायिका या चित्रपटात असणार आहेत. यातील चार अभिनेत्रींची निवड झाली आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर सहा वर्षांपासून काम सुरू होते. आता स्क्रिप्ट फायनल झाली आहे. बिपाशा बसू, सेलिना जेटली, लारा दत्ता या आधीच्या चित्रपटातील नायिका यात असणारच आहेत, याशिवाय डेझी शाहदेखील असणार आहे. डेझी सलमानच्या एका कॅरेक्टरच्या अपोझिट असेल. या नो एंट्री चित्रपटात तिचे एक आयटम साँगही असेल. सलमाननेच तिचे नाव सुचवले होते. याशिवाय सलमानने डेझीला 'रेस – 4'मध्येही घेणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT