टीडीएम चित्रपट यु-ट्यूबवर पाहायला मिळत आहे  Pudhari
मनोरंजन

TDM Movie | प्रेमाची भुरळ पाडणार 'टीडीएम' यु-ट्यूबवर

टीडीएम चित्रपट यु-ट्यूबवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ख्वाडा' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेत यशस्वी ठरलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा 'बबन' हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. त्यानंतर TDM हा चित्रपट २८ एप्रिल, २०२३ रोजी रिलीज झाला आहे. आता हा चित्रपट युट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी बातमीच्या शेवटी यु-ट्यूबची लिंक दिली आहे.

युट्यूबवर पाहा टीडीएम चित्रपट

टीडीएम आता चित्राक्ष निर्मिती या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या भाऊरावांना सिनेइंडस्ट्रीत ओळखले जाते. विशेष म्हणजे कॉमेडी जॉनर घेऊन भाऊराव यांनी TDM चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील केली आहे.

TDM चित्रपटातील गाण्यांचीही भूरळ

या चित्रपटातील 'एक फुल', 'मनं झालं मल्हारी’ हे गाणंही आधीच लोकप्रिय ठरलं आहे.

TDM चित्रपटात हे आहेत कलाकार

'टीडीएम' चित्रपटात दोन नवख्या कलाकारांची भूमिका होती. अभिनेता पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालिंदी निस्ताने यांनी उत्तम वेळ साधत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडली. गावरान प्रेमकथा आणि चित्रपटातील ग्रामीण संवाद आणि पृथ्वीराज थोरातची ॲक्शन असा चित्रपट पाहायला विसरु नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT