New TV Serial Lapandav Rupali Bhosle return  Instagram
मनोरंजन

New TV Serial Lapandav | 'ती' खलनायिका परत येतेय, 'आई कुठे काय' नंतर रुपाली पुन्हा नव्या मालिकेत

Rupali Bhosle Lapandav | लपंडाव मालिकेतून रुपाली भोसलेचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन

स्वालिया न. शिकलगार

मुंबई - स्टार प्रवाहवर लपंडाव ही नवीकोरी मालिका लवकरच सुरु होणार आहे. आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले एका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. यावेळी संजना नाही तर सरकार बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना रुपाली म्हणाली, ‘लपंडाव मालिकेत तेजस्विनी कामत हे पात्र मी साकारत आहे जिला सगळे आदराने सरकार असं म्हणतात. प्रेम आणि नात्यांपेक्षा तिच्या लेखी पैश्यांना जास्त महत्त्व आहे. घरात आणि ऑफिसमध्येही तेजस्विनीचच राज्य आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आणि आव्हानात्मक आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील मी साकारलेल्या संजना या पात्राला आणि तिच्या लूकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. तेजस्विनी कामतचाही ग्लॅलमरस अंदाज पाहायला मिळेल. माझ्या लूकवर संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतली आहे. मी हे नवं पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना रुपाली भोसलेने व्यक्त केली. लपंडाव लवकरच पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT