Netflix मनोरंजन क्षेत्रातील एक महत्वाची घडामोड समोर आली असून ott मधील दिग्गज कंपनी नेटफ्लिक्स हॉलीवूडची प्रसिद्ध कंपनी वार्नर बद्रर्स यांच्यात करार झाला असून. Netflix आता वार्नर ब्रदर्सचा स्टुडिओ आणि स्ट्रीमिंग व्यवसाय 72 अब्ज डॉलर्सना विकत घेणार आहे. आज त्यांच्यामध्ये असा करार झाला आहे.
या करारामुळे चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांना एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे संपूर्ण मनोरंजन उद्योगात मोठी घडामोड होणार आहे. Warner Bros. कडे त्यांच्या मुख्य फिल्म-टीव्ही विभागासोबत HBO Max आणि DC Studios यांचा समावेश आहे. या कंपन्याचे चित्रपट व सिरीज जगात लोकप्रिय आहेत तर. ओटीटी मध्ये Netflix स्वतःच्या जागतिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध आहे. Stranger Things, Squid Game या सारख्या लोकप्रिय मालिका निर्माण करण्यात प्रसिद्ध आहे.
याबाबात वॉर्नर ब्रदर्सचे CEO डेव्हिड झास्लाव यांनी निवेदनात म्हटले आहे की शंभराहून अधिक वर्षे Warner Bros. ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, संस्कृती घडवली. आता Netflix सोबत एकत्र आल्याने, आमच्या कथा प्रेक्षकांपर्यंत कायमस्वरुपी पोहचतील.
या व्यवहाराबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोख आणि शेअर्सच्या स्वरूपातील हा सौदा असणार आहे. सध्या Warner चा प्रती शेअर 27.75 डॉलर्स इतका आहे, ज्यामुळे कंपनीचे एकूण मूल्य सुमारे 82.7 अब्ज डॉलर्स होते. ही खरेदी 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. Warner च्या प्रतिष्ठित स्टुडिओजचा ताबा मिळाल्याने Netflix च्या चित्रपटगृहातील उपस्थितीतही महत्त्वाचा बदल होणार आहे. या करारानुसार Netflix ने वॉर्नर ब्रदर्सच्या चित्रपटांचे थिएटर रिलीज सुरू ठेवणार आहे. असे आश्वासन त्यांनी दिले आहे.