Netflix Releases June 2025 Canva
मनोरंजन

Netflix वर आठवडाभरात आठ जबरदस्त रिलीज; सिनेप्रेमींना मिळणार फुल एंटरटेनमेंट

या आठवड्यात Netflix वर थ्रिलर, सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनचा जबरदस्त मेगा डोस! जाणून घ्या कोणत्या सीरीज व चित्रपट होणार आहेत रिलीज

shreya kulkarni

Netflix Releases June 2025

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांसाठी ही आठवडाही जबरदस्त ठरणार आहे. कारण Netflix वर या आठवड्यात एकापेक्षा एक थरारक, रहस्यमय आणि अ‍ॅक्शनने भरलेल्या वेबसीरीज आणि चित्रपटांची मालिका रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना या आठवड्यात वेगवेगळ्या शैलींच्या कथा अनुभवता येणार असून, त्या नक्कीच त्यांना खुर्चीला खिळवून ठेवतील.

3 जूनला ‘Sara – Women in the Shadows’ ही सिक्रेट एजंटवर आधारित रहस्यमय कथा प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरीज एका स्त्री एजंटच्या गूढ दुनियेत घेऊन जाणारी आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणेल. त्यानंतर 4 जूनला ‘Criminal Code’ या गुन्हेगारी व थ्रिलरने भरलेल्या मालिकेचा दुसरा सीझन स्ट्रीम होईल. या सीझनमध्ये पोलिस आणि गुन्हेगार यांच्यातील संघर्ष अजून तीव्र होणार आहे.

5 जून हा दिवस दोन मोठ्या सीरीजसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ‘Barracuda Queens’ या 2023 मध्ये गाजलेल्या ड्रामा सीरीजचा दुसरा सीझन या दिवशी प्रदर्शित होणार आहे. ही कथा चोरी आणि गुन्ह्यांभोवती फिरणाऱ्या युवतींवर आधारित आहे. याच दिवशी प्रेक्षकांची आवडती हास्य-नाट्य मालिका ‘Ginny and Georgia’ आपल्या तिसऱ्या सीझनसह पुन्हा एकदा मर्डर मिस्ट्री आणि कौटुंबिक गुंतागुंतीने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणार आहे.

6 जून हा दिवस अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट आणि सीरीजसाठी खास आहे. अ‍ॅक्शनप्रेमींसाठी 2025 मध्ये येणारी ‘K.O.’ ही चित्रपटगाथा एका जबरदस्त फाइटरची कहाणी घेऊन येणार आहे. याच दिवशी एप्रिल 2025 मध्ये रिलीज झालेली साउथ कोरियन फिल्म ‘Mercy for None’ देखील Netflix वर स्ट्रीम होणार आहे, ज्यात एक गैंगस्टर आपल्या भावाच्या मारेकऱ्याचा बदला घेण्यासाठी निघालेला असतो.

इमोशनल ड्रामा पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी Tyler Perry यांचा सिनेमा ‘Straw’ देखील 6 जून रोजी रिलीज होणार आहे, जो नात्यांच्या गुंत्यातील भावनिक प्रवास दाखवतो. तसंच ऑस्ट्रेलियन वेबसीरीज ‘The Survivors’ देखील 6 जून रोजी Netflix वर स्ट्रीम होणार आहे. मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स आणि थ्रिलरचा जबरदस्त संगम असलेली ही मालिका देखील प्रेक्षकांची पसंती मिळवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT