मनोरंजन

Neha Sharma : वडील अजित शर्मांच्या पराभवानंतर नेहाची भावूक पोस्ट

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा गेल्या काही दिवसापासून लोकसभा निवडणूक कारणाने चर्चेत आली आहे. नेहाचे वडील आणि काँग्रेसचे अजित शर्मा हे भागलपूर मतदार संघातून निवडणुक लढवत होते. याचदरम्यान नेहाने निवडणूक प्रचारासाठी कोणतीही कसर कमी केलेली नव्हती. परंतु, काल लागलेल्या निकालात अजित शर्मा यांचा दारूण पराभव झाला आणि जेडीयूचे अजय मंडल विजयी झाले. आता नेहाने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री नेहा शर्माने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वडिलांच्या पराभवाचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, "आमच्या सर्वांसाठी हा काळ खूपच कठीण होता. पुर्ण ताकदीचे आम्ही लढलो. माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना मतदान केले त्यांची मी आभारी आहे. आम्ही येथेच थांबलो नाही, तर आमचे समाजासाठीचे कार्य सतत चालू राहील. या अपयशाने खचून न जादा पुढे जाणे पसंत करतो."

याशिवाय नेहा शर्माने द्वारका प्रसाद माहेश्वरी यांच्या 'वीर तुम बढे चलो' या कवितेतील चार ओळीही लिहिल्या आहेत. "सामने पहाड हो, सिंह की दहाड हो। तुम निडर डरो नहीं, तुम निडर डटो वहीं। वीर तुम बढे चलो! धीर तुम बढे चलो!" अशा कविताच्या ओळी आहेत. यासोबत नेहाने रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे आणि हॅशटॅग "भागलपूर लोकसभा निवडणूक" असे दिले आहे.

जेडीयूचे अजय मंडल यांनी काँग्रेसचे अजित शर्मा यांचा १,०४,८६८ मतांनी पराभव केला आहे. यानंतर आपला पराभव स्विकारत नेहाच्या वडिलांनी सांगितले आहे की, "भागलपूरच्या लोकांसाठी आमदार म्हणून काम करत राहणार. कारण गेल्या १५ वर्षांत खासदाराने येथे कोणतेही काम केलेले नाही. परंतु, जनतेचा दिलेला निर्णय मला मान्य आहे."

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT