neetu kapoor on giving ranbir kapoor alia bhatt privacy despite living in same home
पुढारी ऑनलाईन :
Neetu Kapoor यांना विनाकारण ‘कूल सासू’चा टॅग मिळालेला नाही. खऱ्या आयुष्यातही त्या तितक्याच समंजस आणि शांत स्वभावाच्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, एकाच इमारतीत राहूनही त्या मुलगा Ranbir Kapoor आणि सून Alia Bhatt यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करत नाहीत.
आलिया भट्टची सासू आणि रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांना अनेक जण पसंत करतात. त्यांना ‘कूल सासू’ म्हणूनही ओळखले जाते. एका पॉडकास्टमध्ये बोलताना नीतूंनी सांगितले की, त्या आलिया-रणबीरच्या खासगी आयुष्याला पूर्णपणे स्पेस देतात. त्यांनी राहाच्या संगोपनाबाबतही दोघांचे कौतुक केले.
आलिया-रणबीरच्या पालकत्वाचे कौतुक
Soha Ali Khan हिच्या पॉडकास्टमध्ये नीतू कपूर म्हणाल्या, “रणबीर खूपच उत्तम वडील आहे आणि आलियाही उत्कृष्ट आई आहे. दोघेही आपल्या कामात खूप व्यस्त असतात, पण तरीही ते मुलीसाठी वेळ काढतात आणि तिची उत्तम काळजी घेतात.”
“मी त्यांच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप करत नाही” नीतू कपूर या आलिया आणि रणबीरसोबत एकाच इमारतीत राहतात. मात्र त्या म्हणाल्या, “मला वाटतं, मुलांची लग्नं झाल्यानंतर त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्यायला हवं. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो, पण मी मनाला येईल तशी त्यांच्या घरी जात नाही. मी त्यांना त्यांची स्पेस देते.”
त्या पुढे म्हणाल्या,
“त्यांना असं वाटू नये की त्यांची आई कायम त्यांच्या घरात बसलेली असते. मी त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करत नाही. अगदी Raha Kapoor सुद्धा तिच्या वेळेनुसार माझ्याकडे येते. मी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घरी जात नाही.”
रिद्धिमाबाबतही अशीच भूमिका
नीतू कपूर यांनी सांगितले की, मुलगी Riddhima Kapoor Sahni हिच्या लग्नानंतरही त्यांनी तिच्या आयुष्यात हस्तक्षेप केला नाही. त्या म्हणाल्या, “रिद्धिमाचं लग्न झाल्यावर मी Rishi Kapoor यांना सांगायचे की तिला रोज फोन करू नका. मी त्यांना म्हटलं होतं की आता तिचं लग्न झालं आहे, तिचं स्वतःचं आयुष्य आहे. तिच्या आयुष्यात थोडी मोकळीक द्यायला हवी.”
आलिया-रणबीरचं आलिशान घर
आलिया आणि रणबीर नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांच्या पाली हिल येथील नव्या घरात राहायला गेले. रणबीर, आलिया आणि राहासोबत नीतू कपूरही त्याच इमारतीत राहतात. मात्र प्रत्येकाचा स्वतंत्र फ्लोअर आणि खासगी स्पेस आहे. या आलिशान प्रॉपर्टीची किंमत सुमारे २५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.