Laxmikant Berde gifted Kolhapuri Chappal to Neena Gupta Instagram
मनोरंजन

Neena Gupta | करीनाच नव्हे नीना गुप्तांनाही आवडते कोल्हापुरी चप्पल, लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिली होती भेट

Laxmikant Berde gifted Kolhapuri Chappal to Neena Gupta Prada controversy | करीना नंतर आता नीना गुप्ता; लक्ष्मीकांत बेर्डेंनी गिफ्ट दिली होती 'कोल्हापुरी चप्पल'

स्वालिया न. शिकलगार

Laxmikant Berde gifted Kolhapuri Chappal to Neena Gupta

मुंबई - प्राडा वाद सर्वश्रृत आहे. आता 'पंचायत'ची अभिनेत्री फॅशनिस्टा नीना गुप्ता यांनी कोल्हापुरी चप्पल विषयी एक फोटो पोस्ट शेअर केलीय. त्यांनी कोल्हापूरी चपलेच्या बाजूने भूमिका घेतली आहे. खास म्हणजे अभिनेत्री नीना यांना दिवंगत मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ही कोल्हापुरी चप्पल भेट दिली होती, जी हँडमेड आहे.

नीना गुप्ता यांनी प्राडा विरुद्ध कोल्हापुरी वादाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट केलीयत्यांनी इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे क्लासिक कोल्हापुरी चप्पलेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याआधी करीना कपूर खानने देखील लक्झरी ब्रँड प्राडावर टीका करत भारतीय फुटवेअरचे समर्थन केले होते.

नीना गुप्ता यांनी व्हिडिओमध्ये त्यांची कोल्हापुरी चप्पल दाखवली आहे. रिपोर्टनुसार नीना यांनी म्हटलं की, ''हस्तनिर्मित कोल्हापुरी चप्पल, दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट दिली. एक कलाकृती, एक आठवणी..खरोखरच अद्वितीय.''

नेटिझन्सनी दिली प्रतिक्रिया

तिच्या या व्हिडिओवर नेटिझन्स म्हणाले- ''कोल्हापुरीने स्वतःची जागा निर्माण केलीय. भारतीय ब्रँडला पाठिंबा आणि प्रमोट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही नेहमीच प्रेरणा आहात.'' दुसऱ्याने पुढे म्हटले, ''वा इतके वर्ष जशीच्या तशी आहे, हे अद्भुत आहे.''

एका मुलाखतीत, नीना यांनी बदलत्या फॅशनबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितले, ''लोक माझ्यासाठी कमेंटमध्ये लढतात आणि मला हवे ते कपडे घालण्याच्या माझ्या निर्णयाचे समर्थन करतात, जे छान आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत माझ्यात आत्मविश्वास नव्हता...सोशल मीडियामुळे, मी आता मला जे हवे आहे ते बोलू शकते... तुम्ही स्वतःला जास्त गांभीर्याने घेऊ शकत नाही. यश तुम्हाला आत्मविश्वास देते - जर बधाई हो ने मला अधिक यशस्वी केले नसते, तर कदाचित मी इतके प्रामाणिक राहू शकले नसते. यश खूप फरक पाडते.”

SCROLL FOR NEXT