मनोरंजन

Afwaah Trailer : भूमी-नवाजुद्दीनचा ‘अफवाह’ यादिवशी रिलीज होणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमी पेडणेकर या पॉवर परफॉर्मर्सच्या अपारंपरिक जोडीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा चित्रपट, 'अवफाह'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Afwaah Trailer) हा चित्रपट ५ मे, २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधीर दिग्दर्शित हा चित्रपट एक विलक्षण थ्रिलर आहे. मिश्रा आणि अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केले आहे. एखाद्या अफवेमध्ये एखाद्याचे आयुष्य उलथापालथ करण्याची ताकद कशी असते, याबद्दल बोलतो. नवाजुद्दीनसोबत सुमीत व्यास, टीजे भानू आणि शारिब हाश्मी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. (Afwaah Trailer)

निर्माते अनुभव सिन्हा पुढे म्हणाले, "या महत्त्वाच्या चित्रपटासाठी सुधीरसोबत काम करणे हा एक समृद्ध अनुभव आहे. मला विश्वास आहे की 'अफवाह' हा एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे जो उच्च आशयाचे चित्रपट बनवण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करतो."

अफवाहचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, भूमी पेडणेकर, शारीब हाश्मी, सुमित कौल, सुमीत व्यास, रॉकी रैना आणि टीजे भानू यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या बनारस मीडियावर्क्सच्या बॅनरखाली तयार केला आहे. अफवाह ५ मे, २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

SCROLL FOR NEXT