लीला यश-रेवतीचं लग्नगाठ बांधण्यात यशस्वी होईल? instagram
मनोरंजन

रेवती-यशचं नातं जोडताना एजे-लीलाच्या नात्यामध्ये येणार दुरावा?

Navri Mile Hitlerla | लीला यश-रेवतीचं लग्नगाठ बांधण्यात यशस्वी होईल?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'नवरी मिळे हिटलरला' येत्या काही भागात खूप घडामोडी घडणार आहेत. मालिकेत एजे, यश आणि श्वेताच्या एंगेजमेंटची तारीख जाहीर करतो. दुर्गा लीलाला सावध करते आणि रेवतीला तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून बदनाम करण्याचा प्रयत्न करते. लीला आता एका नवीन मिशन वर आहे, ते म्हणजे आपल्या बहिणीच्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसुन त्या मागचं सत्य बाहेर आणणं. इकडे कालिंदी लीलाला धमकावते की, जर यश आणि श्वेताची एंगेजमेंट रद्द झाली नाही तर तिला या घरात येण्यास बंदी असेल.

दरम्यान, एक रहस्यमय आकृती त्यांचे संभाषण ऐकतेय. यश आणि रेवतीच्या एकमेकांबद्दलच्या भावना माहित असून देखील श्वेताला अजूनही या लग्नाला पुढे जायचे आहे जे ऐकून लीलाला धक्का बसतो. लीला रेवतीला एजेकडे यशबद्दलच्या तिच्या प्रेमाची कबुली देण्यास भाग पाडते, पण किशोर रेवतीचा अपघात घडून आणण्याचं प्लँनिंग करतोय. यशला इमर्जन्सी कॉल येतो आणि तो हॉस्पिटलमध्ये धावतो. दुर्गा यशला ब्लॅकमेल करत रेवतीला विसरायला सांगते अन्यथा ती तिच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे देणार नाही असं यशला सांगते. लीलाला, या अपघातामागे दुर्गाचा हात असल्याचा संशय आहे. एजेला यश आणि रेवतीच्या प्रेमाबद्दल कळतं आणि त्यांच्या प्रेमाला पाठिंबा देण्याचा निर्णय तो घेतो, पण यश अचानक बेपत्ता झालाय.

लीला यश-रेवतीचं लग्नगाठ बांधण्यात यशस्वी होईल? या सगळ्या गोंधळामुळे एजे-लीलाच्या नात्यात पुन्हा दुरावा येईल? यासाठी बघायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT