Nana Patekar slap Madhoo pudhari
मनोरंजन

Nana Patekar slap Madhoo: पाटेकरांनी स्टार अभिनेत्रीला लगावली कानशिलात... नंतर घेतला बदला; 'यशवंत'वेळी नेमकं काय झालं?

Anirudha Sankpal

Nana Patekar slap Madhoo: नाना पाटेकर यांनी आपल्या कसदार अभिनयानं हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला आहे. नानांचा जसा अभिनय कसदार आहे तसाच त्यांचा स्वभाव देखील कडक आहे. त्यामुळे त्यांच्या कडक शिस्तीचे सेटवरील आणि कार्यक्रमावेळील किस्से असंख्य आहेत. असाच एक किस्सा प्रसिद्ध अभिनेत्री मधू यांनी सांगितला आहे.

मधूंनी सांगितला नानांसोबतचा किस्सा

प्रसिद्ध अभिनेत्री मधू यांनी हिंदी आणि दाक्षिणात्या चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांनी आता मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. मधू यांनी आपल्या कसदार अभिनयाने धमाका करण्यास सुरूवात केली आहे. नुकतेच त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य याबाबद्दल सांगितलं. त्यांनी नाना पाटेकरांचा देखील उल्लेख करत त्यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर केला.

मधू यांनी नाना पाटेकरांसोबत यशवंत या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट १९९७ मध्ये रिलीज झाला होता. दरम्यान, मधू यांनी नुकतेच हिंदी रश ला एक मुलाख दिली. त्यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत त्या मेथर्ड अॅक्टर कशा झाल्या हे सांगितलं.

माझ्यासाठी हा मोठा शॉक होता

मधू यांनी सांगितलं की, चित्रपटात एक सीन होता ज्यात आम्ही ग्लिसरीन डोळ्यात घालून शूटसाठी तयार होतो. मात्र नाना पाटेकर म्हणत होते की ग्लिसरीन घालू नका. सीन फील करा खरे अश्रू आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा.

मधू यांनी पुढे सांगितलं की, सीन शूट करतेवेळी त्यांनी मला खरोखरची थप्पड मारली, त्यांचा उद्येश मी खरोखरच रडावं हा होता. कानशिलात बसल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्यावेळी मला राग देखील आला होता. कारण रिहर्सलवेळी ते असं करत नव्हते. रिहर्सलमध्ये त्यांना कानाखाली मारली नव्हती. त्यामुळं माझ्यासाठी हा शॉक होता. त्यांनी खरोखरचं मला कानशिलात लगावली होती.

मी देखील बदला घेतला

मधू यांनी सांगितलं, मी खूप रागीट व्यक्ती होते. आजूनही आहे. त्यामुळं मी देखील त्यांना कानशिलात मारली. एक कलाकार म्हणून त्यांनी मला मारलं आणि मी दुसऱ्या टेकमध्ये मला त्यांना थप्पड मारायची होती. मी ती मारली. मधू यांनी सांगितलं की ज्यावेळी त्या बॉलीवूडमध्ये काम करत होत्या त्यावेळी त्या खूप पार्ट्यांना जात नव्हते. मला पार्टीत जाऊन काम मिळवायचं नव्हतं. मी माझ्या मेहनतीच्या जोरावर काम मिळवू इच्छिते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT