Nafisa Ali shared Bald Look
मुंबई - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र यावेळी कारण थोडं भावनिक आहे. नफीसा अली सध्या कॅन्सरच्या चौथ्या स्टेजशी झुंज देत आहे. नुकतेच त्यांनी आपला बाल्ड लूक (Bald Look) शेअर केला असून, त्यासोबत “पॉजिटिव्ह पॉवर (Positive Power)” असा छोटा पण प्रभावी संदेश दिला आहे.
नफीसा अली कॅन्सरशी झुंजत आहेत. त्या कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये आहेत. त्यांची किमोथेरेपी सुरु आहे. पण नफीसाने या कठिण समयी सकारात्मक राहून हिंमत न हारण्याचा संदेश पोहोचवला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर बाल्ड लूकमध्ये फोटो शेअर केला आहे.
नफीसा अली यांना २०१८ मध्ये पहिल्यांदा स्टेज ३ पेरिटोनियल आणि ओवेरियन कॅन्सरचे निदान झाले होते. २०१९ मध्ये त्यांनी घोषणा केली होती की, या आजारावर त्यांनी मात केलीय. पण नुकताच त्यांनी खुलासा केला की, कॅन्सर पुन्हा उद्भवला आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट दिसते की, नफीसाने आपल्या उपचारादरम्यानचा एक बॉल्ड लूकदेखील शेअर केला आहे. नफीसा अलीने इन्स्टाग्रामवर एक हसताना सेल्फी शेअर केला आहे, त्याला कॅप्शन लिहिलीय- "पॉजिटिव एनर्जी". यानंतर लगेच दीया मिर्जाने हार्ट इमोजीसह कॉमेंट केलं. तर अनेकांनी प्रार्थना केल्या.
शेअर केलेल्या फोटोत दिसते की, नफीसा अली बाल्ड लूकमध्ये आहे. त्यांनी यलो कलरची कुर्ती, ब्राउन कलरचा पायजामा घातला आहे. गोल्ड चेन आणि बांगड्या देखील घातल्या आहेत. सोबतच घड्याळ देखील घातले आहे.
फोटोमध्ये त्यांचा नातू हातात कात्री घेऊन त्यांचे केस कापताना दिसत आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं- माझा नातू माझे केस गळ्यापासून रोखण्यासाठी मदत करत आहे. आणखी एका फोटोमध्ये नफीसा यानी सांगितलं होतं की, त्यांची किमोथैरेपी सुरू झाली आहे आणि केस गळणे सुरु झाले आहे...
नफीसा अली यांनी लाईफ इन अ मेट्रो, जुनून, मेजर साब, बिग बी, ये जिंदगी का सफर, आतंक, यमला पगला दिवाना, लाहौर, उंचाई यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबत ती एक समाजसेविका आणि प्रेरणादायी वक्ता म्हणूनही ओळखली जाते.