रांगडा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होत आहे  rangda movie Instagram
मनोरंजन

'या' महिन्यांमध्ये एकापेक्षा एक पाहा मराठी चित्रपट

जुलै आणि ऑगस्टमध्ये मराठी चित्रपटांचा महोत्सव

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सिनेरसिकांना एकापेक्षा मराठी चित्रपटा पाहता येणार आहेत. अनेक नवनवीन कथा घेऊन हे चित्रपट येत आहेत. रांगडा, बाई गं, डंका हरिनामाचा, धर्मवीर २ असे चित्रपट पाहता येणार आहेत.

रांगडा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होत आहे

"रांगडा"मध्ये अनुभवता येणार कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार

चित्रपट - रांगडा

प्रदर्शित तारीख - १२ जुलै

महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती, बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या रांगडा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेशदादा लांडगे आणि बैलगाडा मालक, पैलवान मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे, राहुल गव्हाणे, मच्छिंद्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी "रांगडा" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली आहे. बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. संवादलेखक म्हणून दीपक ठुबे यांनी काम पाहिले आहे. अजित मांदळे, नौशाद इनामदार यांनी संकलन तर अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे.

अरुण वाळूंज, प्रमोद अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे,अतिक मुजावर, संदीप (बापु)रासकर,राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद यांच्या प्रमुख भूमिका असतील. विशेष म्हणजे, दोन राष्ट्रीय कुस्तीपटू चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Baai Ga Movie vaghacha doggi song

'बाई गं' चित्रपटाचं गाणं "वाघाचा डॉगी" भेटीला

चित्रपट - बाई गं

प्रदर्शित तारीख - १२ जुलै

प्रत्येक कपल ची लव्ह स्टोरी खास असते पण जेव्हा त्या लव्ह स्टोरीमध्ये एखादी बायको रुसते तेव्हा नवऱ्याला दिवसात पण तारे दिसतात ह्यात काही शंका नाही. "वाघाचा डॉगी" ह्या गाण्यात सुद्धा अभिनेता स्वप्नील जोशी ची हालत अशीच काहीशी झाली आहे. लग्ना नंतरच्या रुसवा रुसवी नंतर एकाद्या नवरायची कशी तरा होते हे ह्या गाण्यात आपण पाहू शकतो. बसल्या जागी तो बिचारा पूर्णपणे फसलाय. "वाघाचा डॉगी" ह्या गाण्यात परदेशातल्या मुली चक्क मराठी गाण्यावर आपले पाय थिरकवताना दिसत आहे. जय अत्रे यांनी लिहिलेले हे गाणं नकाश अझीझ आणि वृषा दत्ता यांनी गायलं आहे.

वरूण लिखाते ह्यांनी या गाण्याला संगीत देण्याबरोबरच इंग्लिश लिरिक्स सुद्धा लिहिले आहे. 'बाई गं' या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत इतर कलाकार जसे प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत चित्रपट आहे.

डंका हरिनामाचा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

डंका..हरीनामाचा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर

चित्रपट - डंका..हरीनामाचा

प्रदर्शित तारीख - १९ जुलै

रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत ‘डंका… हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला.

सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव कलाकार आहेत. निर्माते रविंद्र फड आहेत.

पटकथा आणि संवाद श्रेयस जाधव, अंशुमन जोशी, संकेत हेंगा यांचे आहेत. छायांकन प्रदीप खानविलकर, संकलन आशिष म्हात्रे यांचे आहेत. कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. वेशभूषा सानिया देशमुख तर साहस दृश्ये परमजीत सिंह ढिल्लोन यांची आहेत. संगीत -अभिनय जगताप, कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत.

धर्मवीर - २ पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित "धर्मवीर - २'' जगभरात

चित्रपट - धर्मवीर - २

प्रदर्शित तारीख - ९ ऑगस्ट

नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. स्वर्गीय आनंद दिघे साहेब दिसत असलेल्या या टीजरने 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की' या दमदार संवादामुळे लक्ष वेधून घेतले आहे. "धर्मवीर -२" हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता बॉबी देओल, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थित लॉन्च झाले.

"धर्मवीर - २" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा,पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांची आहे. महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. "हिंदुत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही" अशी ओळही त्यात नमूद करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT