रहमान यांनी बॉलिवूडमध्ये काम मिळण्याबाबत भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, "सध्या अशा लोकांच्या हातात निर्णय घेण्याची ताकद आहे जे स्वतः सर्जनशील नाहीत. कदाचित यात धार्मिक भेदभावाचा पैलू असू शकतो.
AR Rahman on religious comment controversy
मुंबई : ऑस्कर-विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील कथित 'धार्मिक' भेदभावाबाबत केलेल्या टिप्पणीवरून झालेल्या टीकेवर आता मौन सोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेनंतर रहमान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. " कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कधीच प्रयत्न नव्हता. भारत माझी प्रेरणा, माझा गुरू आणि माझे घर आहे. मला समजते की, कधीकधी हेतूंचा गैरसमज होऊ शकतो.भारत माझी प्रेरणा, माझा गुरू आणि माझे घर आहे. माननीय पंतप्रधानांसमोर वेव्ह समिटपासून हंस झिमर यांच्यासोबत 'रामायण'साठी संगीत देणे हा माझ्यासाठी सन्मान आहे.," अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नुकत्याच 'बीबीसी एशियन नेटवर्क'ला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी बॉलिवूडमध्ये काम मिळण्याबाबत भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, "सध्या अशा लोकांच्या हातात निर्णय घेण्याची ताकद आहे जे स्वतः सर्जनशील नाहीत. कदाचित यात धार्मिक भेदभावाचा पैलू असू शकतो, पण तो माझ्या समोर कधी आला नाही. या गोष्टी माझ्यापर्यंत लोकांकडून ऐकीव माहितीच्या स्वरूपात पोहोचतात. काम कमी झाल्याने मला आराम मिळतो आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतो, ही चांगलीच गोष्ट आहे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली होती.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रहमान यांनी स्पष्ट केले की, "प्रिय मित्रांनो, संगीत हे नेहमीच संस्कृतीशी जोडण्याचे आणि तिचा सन्मान करण्याचे माझे माध्यम राहिले आहे. भारत केवळ माझे घरच नाही, तर माझी प्रेरणा आणि गुरु देखील आहे. कधीकधी हेतूचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो हे मी समजू शकतो, मात्र संगीताच्या माध्यमातून सेवा करणे आणि सर्वांना प्रोत्साहन देणे हाच माझा एकमेव उद्देश आहे. मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता आणि माझी ही प्रामाणिक भावना तुमच्यापर्यंत पोहोचेल, अशी मला आशा आहे."
भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. येथे सर्जनशील स्वातंत्र्याला महत्त्व दिले जाते. अशा वातावरणात काम केल्याने आपल्यात कलात्मक दृष्टिकोनाला आकार मिळाला. आपल्या आजवरच्या सांगीतिक प्रवासावर भाष्य करताना रहमान यांनी काही महत्त्वाच्या टप्प्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "पंतप्रधानांच्या उपस्थितीत 'जला' सादर करणे असो, नागा संगीतकारांसोबत केलेले काम असो किंवा 'सनशाईन ऑर्केस्ट्रा'ला दिलेले मार्गदर्शन असो; या प्रत्येक प्रवासाने माझा उद्देश अधिक दृढ केला आहे. तसेच हंस झिमर यांच्यासोबत 'रामायण'साठी संगीत देणे हा माझ्यासाठी सन्मान आहे.संगीत भूतकाळाचा सन्मान , वर्तमानाचा उत्सव आणि भविष्याला प्रेरणा देते"