

Chhava Movie गेल्यावर्षी छावा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट अनेकांना भावला होता. विकी कौशलने यामध्ये संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. त्याचे कौतुकही मोठ्या प्रमाणlत झाले. तर या चित्रपटाचे म्युझिक संगीतकार ए. आर. रेहमान यांनी दिले हाते. तेही खूप हिट झाले होते. हा चित्रपट प्रपोगंडा होता असा आरोप झाला होता. त्याबाबात बोलताना ए. आर. रेहमान यांनी चित्रपट का स्वीकारला हे स्पष्ट केले. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत रेहमान यांनी सध्या बॉलिवडू मध्ये चित्रपटांचा प्रवाह बदलत असल्याबद्दल आपली परखड मते व्यक्त केली.
हा चित्रपट संभाजी महाराजांचे शौर्य दाखणारा त्यामुळे स्वीकारला
मी प्रपोगंडा चित्रपट स्वीकारत नाही असे रेहमान यांनी स्पष्ट केले. पण छावा हा चित्रपट प्रपोगंडा चित्रपट होता असे विचारल्यावर त्यांनी मराठा लोकांसाठी संभाजी महाराज प्रेरणा आहेत. चित्रपट विररसपूर्ण होता शेवटी जेव्हा लहान मुली कविता म्हणतात त्यावेळी मराठ्यांचा उर भरून येतो असे म्हटले. यामध्ये औरगंजेबाने संभाजीमहाराज यांच्यावर केलेल्या अत्याचाराचे चित्रण आहे. यापूर्वी महाराष्ट्रात औरंगजेब कबरीवरुन अनेक शहरात दोन समाजात तेढ निर्माण झाली होती. पण संभाजी महाराज यांचे शौर्य दाखवणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश होता त्यामुळे चित्रपट जरी काही बाबतीत एकांगी होता तरी शौर्य चित्रपट असल्यामुळे तो मी स्वीकारला.
दिग्दर्शकांनी मलाचा संगीत देण्याचा आग्रह धरला
मला या चित्रपटाला संगीत देण्यासाठी दिग्दर्शकांनी आग्रहच धरला होता. मी काहीवेळ अशा चित्रपटांसाठी संगीत देताना खूप विचार करतो. पण या चित्रपटाचा आत्मा हा संभाजी महाराज यांचे शौर्य दाखवण्याचा आहे. त्यामुळे जरी काही प्रसंगात द्वेषपूर्ण चित्रण असेल पण जर एकूण विचार केला तर संभाजीमहाराजांच्या शौर्यकथा ऐकल्या तर मराठा समाजाच्या रक्त आजही सळसळते
मी भाग्यवान समजतो
या चित्रपटाला संगीत देणे हे माझे भाग्य समजतो. कारण या चित्रपट ज्या वीर पुरुषावर बेतला आहे ते मराठा समाजासाठी खूप पूजनिय आहेत. संभाजी महाराज प्रत्येक मराठा लोकांच्या मनात एक अढळ स्थान आहे. आणि ज्यावेळी चित्रपट संपतो त्यावेळी शेवटी त्यसा मुली सुंदर कविता म्हणता त्यावेळी तुम्ही खूप भावूक होतात. आणि यापूढे बाकीचे विषय मागे पडतात. असे त्यांनी म्हटले आहे
काही चित्रपट वाईट हेतूनेच बनवले जातात
त्यांनी सांगितले की सध्या चित्रपटसृष्टीत काही वाईट हेतून चित्रपट बनवले जात आहेत. पण मी अशा चित्रपटांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे छावा हा चित्रपटही काही प्रसंगात भेदभाव दाखवणारा आहे हे त्यांनी कबूल केले. पण या चित्रपटाचा ‘कोअर’ हा शौर्य दाखवणार आहे. त्यामुळे मला ज्यावेळी संगीत देण्यासाठी विचारणा करण्यात आली त्यावेळी मी डायरेक्टरला विचारले माझी काय आवश्यकता आहे. त्यावेळी दिग्दर्शकाने मीच हे करु शकतो असे सांगितले.
मला वाटते की आज लोक सुज्ञ आहेत लोकांच्या आत एक विचारी माणूस दडला आहे. योग्य काय व धोकेबाजी कुठे आहे हे ती ओळखात. त्यामुळे चित्रपट पाहून अशा काही समाजाचे अहीत होईल अशा गोष्टी करण्यास ते परावृत होणार नाहीत असा विश्वासही लेजंडरी संगीतकार ए. आर . रेहमान यांनी व्यक्त केला.