मुन्नाभाई ही बॉलीवूडची लोकप्रिय फ्रँचाईजींपैकी एक आहे. या फ्रँचाईजीचे आतापर्यंत 2 सिनेमे आले आहेत. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठीची आनंदाची बाब आहे. या सिनेमाचा तिसरा भाग आता लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील लोकप्रिय जोडगोळी मुन्नाभाई आणि त्याचा लाडका सर्किट तिसऱ्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची चाहते वाट पहात आहेत. सिनेमाच्या तिसऱ्या भागाबाबत अर्शदने नुकताच खुलासा केला आहे (Latest Entertainment News)
अर्शद वारसीने त्याच्या लेटेस्ट मुलाखतीमध्ये याबाबत स्पष्ट केले आहे. ‘ संजू मध्ये वेगळ्याच प्रकारचे टॅलेंट आहे. त्याच्या सोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. मला स्क्रिप्ट लक्षात ठेवायला त्रास व्हायचा. पण संजूमुळे मला ती लक्षात राहिली. करण तो दरदिवशी सेटवर येऊन विचारायचा, आज आपण कोणता सीन करतो आहे.
वरील मुलाखतीमध्ये बोलत बोलत त्याने सांगितले की, पहिल्यांदा या सिनेमाविषयी काहीच अपडेट नव्हती. पण आता राजकुमार हिरानी यांनी या सिनेमावर काम करायला सुरुवात केली आहे. ते या स्क्रिप्टवर चांगलीच मेहनत घेत आहेत.
अर्शद म्हणतो, मला वाटत आहे की आता हा सिनेमा बनायला हवा. मागच्या वर्षी हिरानी यांनी मला सांगितले की त्यांच्याजवळ एक खास आयडिया आहे.
2023 मध्ये अर्शदमध्ये ने सांगितले होते की मुन्ना भाई 3 कदाचित बनणार नाही. कारण हिरानी यांना कथानकाबाबत 200 टक्के खात्री असल्याशिवाय ते काम सुरू करणार नाहीत.
बॉलीवूडमध्ये मुन्नाभाई फ्रँचाईजीने राजकुमार हिरानी, संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या करियरला नवी उभारी देणारा ठरला.