मनोरंजन

गुपचुप लग्नानंतर मुनव्वर फारुकी दुसऱ्या पत्नीसोबत हनीमूनसाठी लोणावळ्याला?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस-१७' चा विजेता मुनव्वर फारूकी दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. मुनव्वर फारूकीने गुपचुपपणे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोटवालासोबत निकाह (विवाह) केला होता. मुनव्वर फारूकी आणि मेहजबीन कोटवाला एकत्र केक कापताना दिसले. आता रिपोर्टनुसार, मुनव्वर फारूकी आणि मेहजबीन कोटवाला हनीमूनसाठी लोणावळामध्ये गेल्याचे वृत्त समोर आले आहे. मेहजबीनच्या इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा-

मेहजबीन कोटवालाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये ती ब्लॅक रेंजरोवर कारजवळ पोज देताना दिसते. आणखी एक फोटो लोणावळाच्या एका रिसॉर्टचा आहे. यावरून तर्क लावला जात आहे की, मेहजबीन कोटवाला आणि मुनव्वर फारूकी लोणावळामध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. त्यांचा हा फोटो पाहून मुनव्वर फारूकीचे फॅन्स खूप कॉमेंट करत आहेत.

अधिक वाचा-

एका युजरने लिहिल, "दो

दिल मिल रहे हैं, मगर चुपके-चुपके. मुनव्वर फारूकी आणि मेहजबीन कोटवालाने २६ मे रोजी निकाह केला होता. खास बाब म्हणजे, दोघांची भेट अभिनेत्री हिना खानच्या माध्यमातून झाली होती. एक कार्यक्रमात हिना खानने मेहजबीन कोटवालाला मुनव्वर फारूकीचा मेकअप करण्यासाठी पाठवले होते. तेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले."

अधिक वाचा-

photo – Rahul Yadav x अकाऊंटवरून साभार

SCROLL FOR NEXT