Mumtaaz on Big B amitabh Bachchan :
अमिताभ बच्चन यांच्या नावाचे गारुड आजही सिनेरसिकांच्या मनावर आहे. केवळ सिनेरसिकच नाहीत तर त्यावेळी आणि आजपर्यंतही बिग बीसोबत काम केलेल्या सहकलाकारही त्यांचे कौतूक करताना थकत नाहीत. 70च्या दशकातील अभिनेत्री मुमताजही याला अपवाद नाही. बिग बीसोबत केवळ एका सिनेमात काम केलेल्या मुमताजने त्यांच्याबाबत केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका रेडियो स्टेशनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केले आहे.
त्या म्हणतात, त्यांना आश्चर्य वाटते की अमिताभ सारखी व्यक्ति सिनेसृष्टीत आली. ते खूप श्रीमंत होते. त्यांच्याजवळ बंगला होता. तरीही ते बॉलीवूडमध्ये आले याचे मला आश्चर्य वाटते. पुढे त्या म्हणतात, मी वयाच्या सातव्या वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करते आहे. त्यासाठी मला शाळाही सोडावी लागली. मी एक्स्ट्रा म्हणून काम करायचे. त्यावेळी मला एका रोलचे 700 रुपये मिळायचे. त्यापैकी 100 रुपये मला कास्टिंग एजंटला द्यावे लागायचे. तर 500 रुपये मी आईला देत असे.’
पुढे त्या म्हणतात, ‘दुसरीकडे अमिताभ खूप शिकलेले आणि क्लासी व्यक्ति होते. त्यांचे वडील एक प्रसिद्ध व्यक्ति होते. त्यांच्याजवळ बंगला आणि एक चांगले, समृद्ध आयुष्य होते. त्यामुळे मला वाटत असे यांना अॅक्टर बनायची काय गरज आहे. पण ते अत्यंत उत्तम मनुष्य आहेत. त्यांचा एक खास क्लास होता. त्यांच्यासोबत आणखी काम करायची संधी मिळाली असती तर बरे झाले असते.
अमिताभ आणि मुमताज यांनी केवळ एकदाच काम केले होते. बंधे हात या सिनेमातून हे दोघे एकत्र दिसले होते. अर्थात या सिनेमाला फार मोठे व्यावसायिक यश मिळाले नाही.