

Actress Preity Talreja Abuse:
कृष्णदासी या मालिकेत दिसलेली अभिनेत्री प्रीती तलरेजाला लग्नानंतर एका भयानक सत्याला सामोरे जावे लागले होते. तिच्यावरील अत्याचाराच्या काही वर्षापूर्वीच्या या बातमीने प्रत्येकालाच धक्का बसला होता. प्रीतीने पतीवर धर्म लपवून लग्न केल्याचा आरोप केला होता. याशिवाय लग्नानंतर शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचेही सांगितले होते.
लग्नानंतर पतीने जबर मारहाण सुरू केल्याचे प्रीतीने सांगितले. प्रीतीला अर्धमेली होईपर्यंत मारहाण झाली होती. शेवटी प्रीतीने मुख्यमंत्री आणि प्राइम मिनिस्टर ऑफिसकडे मदतीची याचना केली होती. या प्रकरणाविरोधात प्रीतीने सोशल मिडियावरही पोस्ट शेयर केली होती.
विशेष म्हणजे प्रीतीने पतीबाबत केलेले हे खुलासे धक्कादायक होते. अभिजीत पेटकर असे प्रीतीने पतीचे नाव सांगितले होते. तिचे आणि अभिजीतचे लव्ह मॅरेज होते. पण माराहणीनंतर तिने आरोप केला होता की, पतीचे खरे नाव अभिजीत नसून तो धर्माने मुस्लिम आहे. अर्थात पतीचे हे सत्य तिला लग्नानंतर समजले. पण पतीने लग्न होईपर्यंत ही बाब तिच्यापासून लपवून ठेवल्याचेही सांगितले. लग्नानंतर मात्र पतीचे खरे स्वरूप समजल्यावर तिला धक्का बसला. लग्नाच्या वेळी निकाह केला गेला. प्रीती पुढे म्हणाली की मशिदीतून त्यांना लग्नाचे सर्टिफिकेट मिळाले नाही. यानंतर मात्र अभिजीतने तिच्यावर धर्मांतरांसाठी दबाव टाकणे सुरू केले. यासोबतच तिला मारहाणही केली. प्रीतीने या जखमांचे फोटोही सोशल मिडियावर शेयर केले होते.
लग्नापूर्वी प्रीती आणि अभिजीत तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यावेळी त्याने प्रीतीला धर्माबाबत काहीच कल्पना दिली नव्हती. लग्नानंतर त्याने मुस्लिम असल्याचे सांगितले पण धर्मांतराचा कोणताही पुरावा त्याने दिला नाही. असे ट्वीट करत तिने त्यावेळी PMO आणि ठाणे पोलिसांना टॅग केले होते. त्यावेळी प्रितीच्या या दाव्याने गजहब उडाला होता. त्यानंतर प्रीती जवळपास सोशल मिडियावरुन गायब आहे. तिने instagram अकाऊंटही बंद केले आहे.