मनोरंजन

‘मुंबई एक त्योहार है’ या मुंबई फेस्टिव्हलच्या गीताचे अनावरण

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल वतीने नववर्षाच्या सुरुवातीलाच मुबंई आर्ट फेस्टिव्हल आयोजित केला आहे. या फेस्टिव्हलच्या गीताचे नुकतेच अनावरण झाले. (Mumbai Festival ) या गीताचे मुख्य वैशिट्य म्हणजे, यात द धारावी ड्रीम प्रोजेक्टमधील कलाकारांचा सहभाग आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी या वस्तीतील कलाकारांचा 'मुंबई एक त्योहार है' या गाण्यातील सहभाग हे सांस्कृतिक वैविध्यतेची समरसता असल्याचे उदाहरण आहे. २० ते २८ जानेवारीदरम्यान मुंबई आर्ट आयोजन केले आहे. (Mumbai Festival )

संबंधित बातम्या –

फेस्टिव्हलच्या गीत निर्मितीत संगीतकार शमीर टंडन, गायक शंकर महादेवन, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझा, गायिका फाल्गुनी पाठक, गायिका हर्षदीप कौर आणि गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनीही मोलाचे योगदान दिले आहे.

एकतेचा गौरव करणारा कॅनव्हास विविध वाद्ये सुरांच्या सिम्फनीद्वारे, विविधतेतील शहराच्या एकतेचा गौरव करणारा कॅनव्हास रंगवला. नाशिक ढोलचे गुंजणारे ताल, गरब्याच्या उत्साही ताल आणि बले बल्लेचे विजयी प्रतिध्वनी हे मुंबईच्या फॅब्रिकमध्ये अखंडपणे विणलेले मराठी, गुजराती आणि पंजाबी संस्कृतीचे सार या गीतातून प्रतीत होते, अशी माहिती गीताच्या निर्मितीत प्रकियेतील कलाकारांनी दिली आहे, असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

हा उत्सव जागतिक पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करेलच, शिवाय जे पर्यटक मुंबईची भव्यता आणि खोली अनुभवायला येतात त्यांना मुंबईची अद्वितीय वैशिष्ट्ये अनुभवायला मिळतील, असे मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT