Monalisa Controversy pudhari
मनोरंजन

Monalisa Controversy: पहिला चित्रपट आहे म्हणून बलात्कार करणार का...? मोनालिसाचा थेट सवाल, सनोज मिश्रांवर केले गंभीर आरोप

Anirudha Sankpal

Monalisa Accuses Director Sanoj Mishra: महाकुंभमेळ्यामुळे एका रात्रीत सेन्सेशन बनलेली मोनालिसालाने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे. नुकतेच तिनं आपल्या मुस्लीम मित्रासोबत लग्न केल्यानं वादंग निर्माण झालं होतं. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटात मोनालिसाला अभिनेत्री म्हणून कास् टकेलं होतं. तिला अभिनयाचे धडे दिले होते.

त्यानंतर फरमान खान सोबत लग्न करत मोनालिसाने सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. मोनालिसाच्या या अंतरधर्मीय लग्नाला मोनालिसाचे कुटुंबीय आणि दिग्दर्शक सनोज मिश्रा यांचा विरोध होता. त्यांनी या लग्नाला लव्ह जिहाद असं नाव दिलं. आतापर्यंत या प्रकरणावर गप्प असणाऱ्या मोनालिसाने पत्रकार परिषद घेऊन सनोज मिश्रांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

मोनालिसा जाम भडकली

मोनालिसाने ज्या दिग्दर्शकांच्या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्या सनोज मिश्रांवर गंभीर आरोप केले आहेत. मोनालिसाने सनोज मिश्रा यांनी तिच्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप केला. सनोज मिश्रा यांनी मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याचा दावा केला आहे. ही गोष्ट तिनं कुटुंबीयांना सांगितली होती. विरोध केला होता. मात्र त्यांनी याबाबत कोणती अॅक्शन घेतली नाही. उलट मोनालिसालाच गप्प बसण्यास सांगण्यात आलं.

केरळमध्ये माध्यमांशी बोलताना मोनालिसाने सांगितलं की माझ्या आणि फरमानकडे एकच मार्ग होता. तो म्हणजे आत्महत्येचा... दिल्ली आणि मध्य प्रदेशच्या सरकारने आमची मदत केली नसती तर आम्ही दोघांनी आत्महत्याच केली असती.

आम्हाला मारण्याच्या कापून टाकण्याच्या धमक्या येत होत्या. आमचे पोस्टर जाळले जात होते. मी सर्व सरकारांना हात जोडून विनंती करते की आम्हाला पाठिंबा द्या.

सनोज मिश्रांवर गंभीर आरोप

पत्रकार परिषदेत मोनालिसाने सनोज मिश्रांवर गंभीर आरोप केले. सनोज मिश्रा म्हणतात की मला मोनालिसाचे नाव घेताना देखील लाज वाटते. मी माझ्या चित्रपटाचा भाग असणार नाही. अरे मला तर स्वतःलाच त्यांच्या चित्रपटात काम करायचं नाहीये. कारण ते खूप घाणेरडे मनुष्य आहेत. त्यांचे नाव घेताना देखील मला लाज वाटत आहे. मला घाणेरडं वाटत आहे. ते छोट्या छोट्या मुलींना चित्रपटात काम देते म्हणत त्यांची छेड काढतात. ते चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देतात. ते चित्रपटाच्या आडून चुकीचं काम करतात.

मोनालिसाने रडत रडत सनोज मिश्रा चांगला व्यक्ती नाही असं सांगितलं. त्यानं मला १० वेळा चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. मी माझ्या कुटुंबीयांना हे सांगितलं मात्र त्यांनी मला साथ दिली नाही. मला माहिती आहे की माझ्याबाबत काय घडलं आहे. माझ्यासोबत अन्याय झाला आहे मला न्याय हवा आहे. सनोजने ज्यावेळी मला चुकीचा स्पर्श केला त्यावेळी कुटुंबीयांनी सांगितलं की हा तुझा पहिला चित्रपट आहे. मग काय पहिल्या चित्रपटासाठी माझा बलात्कार करणार का?

चित्रपट रिलीज धोक्यात

दरम्यान, मोनालिसाने केलेल्या आरोपावर सनोज मिश्रांकडून अजून कोणती प्रतिक्रिया आलेली नाही. मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नानंतर सर्वात मोठा धक्का सनोज यांनाच बसला होता. माध्यमांशी बोलताना त्यांनी मोनालिसाने त्यांच्या चित्रपटाचे रिलीज धोक्यात घातलं आहे. चित्रपटाचे एक गाणे मोनालिसासोबत शूट होणार होतं. मात्र आता सनोज मोनालिसासोबत काम करणार नाहीयेत. सनोज आणि मोनालिसाच्या कुटुंबियांनी मिळून पोलीस ठाण्यात जाऊन मोनालिसा आणि फरमान यांच्याविरूद्ध लव्ह जिहादची तक्रार दाखल केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT