मिर्जापूर वेबसीरिजनंतर आता ‘मिर्जापूर द मूव्ही’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात कालीन भैया, मुन्ना आणि गुड्डू पंडित हे लोकप्रिय पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांच्या दराऱ्याने मिर्जापूर पुन्हा हादरणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
मिर्जापूर वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. क्राईम, राजकारण आणि सत्तासंघर्षाच्या कथेमुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेली मिर्जापूर आता थेट मोठ्या पडद्यावर येणार आहे. यंदा ही वेबसीरीज नसून सिनेमा पाहता येणार आहे. ‘मिर्जापूर द मूव्ही’ या नावाने चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यासोबतच रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
या चित्रपटात प्रेक्षकांचे लोकप्रिय पण दरारा असणारे कालीन भैया, मुन्ना तसेच गुड्डू पंडित पुन्हा एकदा भौकाल करणार आहेत. मिर्जापूर वेबसीरिजमधील या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. आजही ते पात्र सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
एक्सल एंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत या चित्रपटाची रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी निर्मिती केली आहे. कासिम जगमगिया-विशाल रामचंदानी सह-निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंहने केले आहे. भारताची सर्वात आयकॉनिक OTT फ्रेंचायजी आता मोठ्या पडद्यावर यायला तयार आहे. निर्मात्यांनी आज मिर्जापुर: द मूवी थिएट्रिकल रिलीज डेटची घोषणा केलीय. हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज होईल.
कालीन भैयाची वापसी
कालीन भैयाची दमदार वापसी विशेष ठरणार आहे. पंकज त्रिपाठी - कालीन भैया, अली फजल - गुड्डू पंडित, दिव्येंदु- मुन्ना भैयाची देखील बहुप्रतीक्षित वापसी होत आहे. पहिल्यांदाच मिर्जापुरची युनिव्हर्स कहाणी सिनेमागृहात उतरेल. फॅन्ससाठी ही मोठी वापसी असणार आहे.
दमदार कलाकारांची फळी
या चित्रपटात जितेंद्र कुमार, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, रवी किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, कुलभूषण खरबंदा, हर्षिता गौर, सुशांत सिंग, सोनल चौहान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.