Mirzapur The Movie Box Office Collection Pudhari
मनोरंजन

Mirzapur The Movie: कालीन भैया-गुड्डू पंडितचा बॉक्स ऑफिसवर भौकाल! ‘मिर्झापूर’ची पहिल्याच दिवशी दणक्यात कमाई, किती पैसे छापले?

Mirzapur The Movie Box Office Collection: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ने थिएटरमध्ये दमदार एन्ट्री करत पहिल्याच दिवशी 24.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Rahul Shelke

Mirzapur The Movie Box Office Collection: ओटीटीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर ‘मिर्झापूर’ची टीम आता मोठ्या पडद्यावर दाखल झाली आहे. कालीन भैया, गुड्डू पंडित, मुन्ना भैया आणि बब्बन बबुआ यांच्या एन्ट्रीला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधूनच त्याच्या जोरदार ओपनिंगचे संकेत मिळाले होते आणि पहिल्याच दिवशी त्याची झलक पाहायला मिळाली.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ने पहिल्या दिवशी तब्बल 24.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची पहिल्या दिवसाची ऑक्युपन्सी सुमारे 42.7 टक्के होती. देशभरात चित्रपटाचे 11,135 शो बुक झाले होते.

हिंदीत सर्वाधिक कमाई

‘मिर्झापूर: द मूव्ही’ला हिंदी पट्ट्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने हिंदी भाषेतून 24.60 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. हिंदी शोची ऑक्युपन्सी सुमारे 43 टक्के होती.

तेलुगू भाषेतही चित्रपटाने काही प्रमाणात कमाई केली आहे. तेलुगूमधून पहिल्या दिवशी सुमारे 15 लाख रुपयांचा व्यवसाय झाला. या भाषेतील 174 शोची ऑक्युपन्सी जवळपास 24 टक्के होती.

‘मिर्झापूर: द मूव्ही’ची एकूण कमाई किती?

पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई 29.70 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. वीकेंडला प्रेक्षकांची संख्या वाढल्यास चित्रपटाच्या कमाईत आणखी मोठी झेप पाहायला मिळू शकते.

रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट तब्बल 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आपला खर्च वसूल करण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. सध्या चित्रपटाने 50 कोटींचा टप्पाही गाठलेला नाही; मात्र सुरुवात दमदार झाल्याने निर्मात्यांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.

‘टॉक्सिक’ आणि ‘हनुमान अंश’समोर मिर्झापूरची टक्कर

बॉक्स ऑफिसवर आधीपासूनच काही चित्रपटांची स्पर्धा आहे. विशेषतः कमी बजेटमध्ये तयार झालेला ‘हनुमान अंश’ सातत्याने कमाई करत आहे. दुसरीकडे यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटालाही मिर्झापूरच्या एन्ट्रीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

आता सर्वांच्या नजरा वीकेंडच्या कमाईवर आहेत. पहिल्या दिवसाची दमदार सुरुवात कायम ठेवत ‘मिर्झापूर: द मूव्ही’ किती मोठा आकडा गाठतो, तसेच त्याच्या एन्ट्रीमुळे इतर चित्रपटांच्या कमाईवर किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT