Mirzapur Movie Collection pudhari
मनोरंजन

Mirzapur Movie Collection: भूल तो नहीं गए... मिर्झापूरनं बॉक्स ऑफिसवर आठवडा गाजवला; 'हनुमान अंश'च्या वादळातही लावला दिवा

Anirudha Sankpal

Mirzapur Movie Weekly Collection: सध्या बॉक्स ऑपिसवर हनुमान अशं हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. मात्र त्याचदरम्यान रिलीज झालेल्या मिर्झापूर द मुव्ही ने देखील पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल केली आहे.

पंकज त्रिपाठी, अली फैजल, दिव्येंदू यांचा मुख्य भूमिका असलेल्या या गँगस्टर थ्रीलर चित्रपटाने गेल्या ७ दिवसात वर्ल्डवाईड २०० कोटींचा गल्ला कमवला आहे. मिर्झापूर मुव्ही देशात १५० कोटीचे नेट कलेक्शन करण्याच्या जवळ पोहचली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशी दमदार कलेक्शन देणाऱ्या या चित्रपटाने संपूर्ण आठवडा कमाईचा आकडा चांगला ठेवला आहे. गुरूवारी यामध्ये १५.९ टक्क्यांची घट झाली होती. मात्र त्यानंतर देखील चित्रपट चांगली कमाई करत आहे.

हनुमान अंशची कडवी टक्कर तरी...

प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापूरच्या दमदार यशानंतर त्याचा चित्रपट मिर्झापूर द मुव्ही प्रदर्शित झाला. वेब सिरीजनंतर चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. याचदरम्यान नीम करोली बाबांवरचा हनुमान अंश हा चित्रपट रिलीज झाला होता. तो दमदार कामगिरी करत असताना देखील मिर्झापूरने देखील आपल्यासाठी बॉक्स ऑफिसवर आपली जागा निर्माण केली.

हनुमान अंशने रिलीजनंतर आपल्या पाचव्या आठवड्यात ९०.२५ कोटी रूपये कमावले. मिर्झापूर कलेक्शनच्या बाबतीत त्यापेक्षा दीड पटीनं पुढं आहे. हनुमान अंशचे एकूण कलेक्शन हे १६३.१३ कोटी रूपये पोहचले आहे.

मिर्झापूरचे कलेक्शन

चित्रपटांच्या कलेक्शनबाबतची माहिती देणाऱ्या Sacnilk नुसार मिर्झापूर द मुव्हीचे सातव्या दिवशी देशात १०३७९ शोज सुरू असून त्यातून १०.५५ कोटी रूपये कमवले आहेत. सहाव्या दिवशी या चित्रपटाने १२.५५ कोटी रूपयांची कमाई केली होती.

गुरमीत सिंह यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे एकूण कलेक्शन हे १७६ कोटींपर्यंत पोहचले आहे. त्यात १४८ कोटी हे नेट कलेक्शन आहे.

मिर्झापूर द मुव्ही अजूनही बजेटच्या मागे

जरी मिर्झापूरने पहिल्या आठवड्यात दमदार कामगिरी केली असली तरी चित्रपटाचे बजेट हे २५० कोटी रूपये होते. त्याच्या अजून ते मागे आहेत. चित्रपट हिट ठरला हे सिद्ध करण्यासाठी मिर्झापूरला देशात जवळपास २६० ते २७० कोटी रूपये नेट कमाई करावी लागणार आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या हैवानची कमाई वाढली तर मिर्झूपरच्या कलेक्शनवर थेट परिणाम होऊ शकतो. दुसरीकडं हनुमान अशं देखील कमाईच्या बाबतीत आता फास्ट ट्रॅकवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT