मिर्झापूर या सिरिजचे नाव लोकप्रिय सिरिजच्या यादीत आवर्जून घेतले जाते. उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर फिरणाऱ्या या सिरिजचा विषय गुन्हेगारी विश्वावर बेतला आहे. ही गोष्ट कालीन भैय्या, मुन्ना आणि बबलू पंडित यांच्या आसपास फिरते. या सिरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत. आता या सिनेमात गजगामिनी गोलू गुप्ताची भूमिका अभिनेत्री श्वेता त्रिपाठी साकारते आहे. विशेष म्हणजे श्वेताने सिरिजमध्येही गोलूची व्यक्तिरेखा साकारली होती. (Latest Entertainment News)
मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता बनारसमधील सेटवर पोहचून खूपच उत्साहित झाली आहे. बनारस हे शहर मिर्झापूरच्या जगात एक महत्त्वाची भूमिका बजावते. यावर बोलताना श्वेता म्हणाली, ‘गोलू माझ्यासाठी फक्त भूमिकेपेक्षा जास्त आहे. माझ्या अस्तित्वाचा एक हिस्साच गोलू बनली आहे.
तिची गोष्ट मोठ्या पडद्यावर दिसणे हे मला एखाद्या स्वप्नासारखे आहे. बनारस माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखे आहे. माझ्या मनात याबाबत एक विशेष स्थान आहे. मसान ते मिर्झापूर सीझन एक आणि दोन प्रत्येक प्रोजेक्टने माझ्यासाठी खास आठवणी सोडल्या आहेत.
मिर्झापूर या सिनेमामध्ये पंचायत फेम जितेंद्र कुमार बबलू पंडितच्या भूमिकेत दिसणार आहे.
या शिवाय कालीन भैय्याच्या व्यक्तिरेखेत पंकज त्रिपाठी दिसणार आहेत.
गुरमीत सिंह या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.
याशिवाय अली फजल, दिव्येंदू, अभिषेक बॅनर्जी आणि रसिका दुग्गल हे देखील दिसणार आहेत.