Mirzapur Season 3  
मनोरंजन

रूबाबदार कालिन भैया-गुड्डू पंडितचा धमाका, ‘मिर्जापूर ३’ ट्रेलर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'मिर्जापूर' च्या तिसऱ्या सीझनचा आज २० जून ट्रेलर रिलीज झाला आहे. फॅन्सना 'मिर्जापूर ३' साठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. आता 'मिर्जापूर ३' च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवली आहे. 'मिर्जापूर ३' चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. 'मिर्जापूर ३' हे ५ जुलै रोजी प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होईल.

अधिक वाचा –

कसा आहे मिर्जापूर ३ चा ट्रेलर?

मिर्जापूर ३ चा ट्रेलर २.३७ मिनिटांचा आणि क्राईमफुल आहे. मिर्जापूर ३ च्या ट्रेलरमध्ये अली फजल भूमिकेत गुड्डू पंडितला अधिक रोल देण्यात आला आहे. सीरीजमध्ये अली फजलने आपल्या अभिनयात जीव ओतला आहे. ट्रेलरचा अखेर त्या भूमिकेने होतो, त्यासाठी सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. पंकज त्रिपाठीचा कालीन भैया रुबाबदार अंदाज, विजय वर्माची छोटीशी झलक शानदार आहे.

अधिक वाचा –

मिर्जापूर ३ मध्ये हे आहेत कलाकार

रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, ईशा तलवार, अंजुमन शर्मा, प्रियांशू पेनयुली, हर्षिता शेखर गौर, राजेश तैलांग, शीबा चड्ढा, प्रमोद पाठक, शरनवाज जीजिना, मेघना मलिक, मनु ऋषी चड्ढा, नेहा सरगम, लिलिपुट फारुकी, अलका अमीन, अननंग्शा बिस्वास, शाहनवाज प्रधान, रोहित तिवारी, प्रसन्ना शर्मा, अनिल जियॉर्ज यांच्या महत्त्वाच्या भूमिका यात आहेत.

अधिक वाचा –

मिर्जापूर ३ चा निर्माता फरहान अख्तर आणि एक्सल एंटरेटनमेंट प्रोड्क्शन कंपनीचे मालक रितेश सिधवानी आहेत. मिर्जापुर ३ चे दिग्दर्शन गुरमीत सिंह आणि आनंद अय्यर यांनी केलं आहे. अपूर्वा धार, अविनाश सिंह तोमर, अविनाश सिंह, विजय नारायण वर्मा यांनी कथा लिहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT