मिर्जापूर मधील कलाकार मानधन किती घेतात?  ali fazal-rasika dugal-pankaj tripathi
मनोरंजन

कालीन भैय्याने Mirzapur 3 साठी घेतली तगडी रक्कम?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मिर्जापूर सीजन ३' चे शुक्रवारी ५ जुलैला प्राईम व्हिडिओवर स्ट्रीमिग झाले. दुसऱ्या सीजनचा अंत मुन्नाच्या मृत्यूने झाला होता. नव्या सीजनमध्ये गुड्डूने गादी सांभाळली आणि कालीन भैय्याच्या वापसीने सत्ता परिवर्तन होताना दिसलं. तुम्हाला माहितीये का, मिर्जापूरमधील कलाकारांनी अभिनयासाठी किती रुपये घेतले आहेत?

पंकज त्रिपाठी

या शोचे मुख्य अभिनेते पंकज त्रिपाठी (कालीन) मिर्जापूरमध्ये सर्वाधिक फी घेणारे अभिनेते आहेत. सीजन २ साठी त्यांनी १० कोटी घेतले होते. त्यामुळे आता सीजन ३ साठी त्यांची फी वाढली असावी, असा कयास लावला जात आहे.

रसिका दुग्गल

रसिका दुग्गलला बीना त्रिपाठीच्या भूमिकेसाठी प्रत्येक एपिसोडला जवळपास २ लाख रुपये मिळाले आहेत.

अली फजल

रिपोर्टनुसार, अली फजल मिर्जापूरच्या प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास १२ लाख रुपये फी घेतो.

जितेंद्र कुमार

रिपोर्टनुसार, जितेंद्र कुमार पंचायत २ मध्ये प्रत्येक एपिसोडला ४ लाख रुपये घेतात. पण, असे अनुमान लावले जात आहे की, मिर्जापूर ३ मध्ये कॅमियो करण्यासाठी त्याने ज्यादा फी घेतली.

पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांच्याशिवाय, या शोमध्ये रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, लिलिपुट, विजय वर्मा आणि ईशा तलवार यांच्या भूमिका आहेत. मिर्जापूरचा पहिला सीजन १६ नोव्हेंबर, २०१८ रोजी रिलीज झाला होता. शोच्या प्रत्येक सीजनला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली.

मिर्जापूरचा दुसरा सीजन २३ ऑक्टोबर, २०२० रोजी रिलीज करण्यात आला होता. अधिकतर उत्तर प्रदेशात मिर्जापूरचे शूटिंग करण्यात आले होते. अंशुमानने या सीरीजच्या पहिल्या सीजनचे दिग्दर्शन केले होते. गुरमीत सिंह आणि मिहिर देसाई यांनी दुसऱ्या सीजनचे दिग्दर्शन केले होते. या सीरीजची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटच्या रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT