Mirai-Baaghi 4-The Bengal Files Box Office Collection
मुंबई : तेजा सज्जा स्टारर चित्रपट मिराई पहिला दिवशी शानदार ठरला. मिराई जादू बॉक्स ऑफिसवर चालत असतानाच बागी ४ आणि द बंगाल फाईल्सची कमाई कासवतीने सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर टायगर श्रॉफचा चित्रपट बागी ४ आणि विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट बंगाल फाईल्स यांना मिराई टक्कर देताना दिसत आहे. मिराई १२ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होताच दमदार ओपनिंग डे कलेक्शन केले आहे.
या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांकडून आणि चित्रपट समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. पण एका आठवड्यातच बागी ४ आणि द बंगाल फाईल्सच्या कमाईत घसरण धालेली पाहायला मिळतेय.
साऊथ अभिनेता तेजा सज्जा सुपर नॅच्युरल मिराई सोबत परतला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक गट्टामनेनीनी केले असून यामध्ये रितिका नायक आणि मंचू मनोज महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रिपोर्टनुसार, मिराईने आतापर्यंत १२ कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.
दरम्यान, टायगर श्रॉफचा चित्रपट बागी ४ आणि विवेक अग्निहोत्री यांचा द बंगाल फाईल्स चित्रपटाच्या कमाईत पहिल्याच आठवड्यात घसरण झालेली पाहायला मिळतेय. बागी ४ ने शुक्रवारी १.२५ कोटींचा बिझनेस केला असून एकूण कलेक्शन ४५.७५ कोटी रुपये बनले आहे.
दुसरीकडे द बंगाल फाईल्सने आज शुक्रवारी केवळ ५५ लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे टोटल कलेक्शन ११.८ कोटी रुपये होत. हा चित्रपट एक आठवड्यात आपले बजेट देखील मिळवू शकला नाही.