मायकल जॅकसन बायोपिक Pudhari
मनोरंजन

Michael Jackson: पॉप जगताचा बेताज बादशहा मायकल जॅकसनच्या बायोपिकचा टीजर पाहिला का? हा कलाकार आहे मुख्य भूमिकेत

मायकलच्या संगीताच्या त्याच्या मूनवॉक या प्रसिद्ध डान्स प्रकाराच्या अनेकजण प्रेमात आहेत

अमृता चौगुले

दिवंगत पॉप स्टार मायकल जॅकसनची जादू आजही कायम आहे. आजही मायकलच्या संगीताच्या त्याच्या मूनवॉक या प्रसिद्ध डान्स प्रकाराच्या अनेकजण प्रेमात आहेत. आता मायकलचा बायोपिक येऊ घातला आहे. या बायोपिकचा टीजर समोर आला आहे. या सिनेमातून मायकलच्या संगीताची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. (Latest Entertainment News)

कोण दिसणार मायकलच्या भूमिकेत

या बायोपिकमध्ये मायकल जॅकसनचा पुतण्या जाफर जॅकसन मुख्य भूमिकेत दिसतो आहे. जाफर हा जर्मेन जॅकसन याचा मुलगा आहे. जाफर लहान असताना त्याच्या आणि मायकलमधील बॉन्ड हा खूपच खास होता. त्यामुळे गोल्फ खेळाडू असलेला जाफर संगीताकडे वळला. 12 व्या वर्षांपासून त्याने गाणे आणि संगीतात नशीब आजमावायला सुरुवात केली. याशिवाय जाफर एक पियानोवादकही आहे.

या टीजरने रिलीज होताक्षणी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. जॉन लोगनने या सिनेमाची पटकथा लिहिली होती. तर एंटोनी फुकवा याने लिहिली आहे.

काय आहे टीजरमध्ये

मायकलच्या टीजरची सुरुवात जॅकसनची पहिली झलकने होते. क्वीन्स जोन्स रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये त्यांच्यासोबत दिसतो आहे. याशिवाय टीजरमध्ये मायकलच्या स्टेजवरील अनेक उत्फुल्ल परफॉर्मन्सची झलकही या टीजरमधून दिसते आहे.

एकजण या टीजरविषयी लिहतो, जाफरला आपल्या काकाच्या भूमीकेत पाहताना आनंद होतो आहे. दुसरा म्हणतो, 'या सिनेमाला ऑस्कर मिळायला हवा.’ एकाने या सिनेमाला टाइम ट्रॅवल असे म्हणले आहे.

कधी रिलीज होणार हा सिनेमा

हा सिनेमा 24 एप्रिल 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT