Chiranjeevi Deepfake Video Instagram
मनोरंजन

Chiranjeevi Deepfake Video: चिरंजीवींचे AI व्हिडिओज पॉर्न साईटवर? मेगास्टारचा संताप!

Chiranjeevi Deepfake Video: मेगास्‍टार चिरंजीवीचे अश्‍लील वेबसाईट्सवर AI व्हिडिओज, गुन्हा दाखल

स्वालिया न. शिकलगार

मेगास्टार चिरंजीवी डीपफेक स्कॅंडलचे बळी ठरले आहेत. त्यांच्या नावाने एआय-जनरेटेड अश्लील व्हिडिओ पॉर्न साइटवर झळकले असून, त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तपास सुरू झाला असून, डीपफेकविरोधात कडक कायद्यांची मागणी होत आहे.

Chiranjeevi Deepfake Video complaint file

मुंबई - साऊथ सिनेमा मेगास्‍टार चिरंजीवीबाबत एक सायबर क्राईम घडले आहे. त्याने हैदराबाद सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल केलीय. त्याने सांगितलं की, त्याचे अनेक डीपफेक व्हिडिओज आहेत. जे अश्‍लील पोर्नोग्राफि‍क वेबसाईट्सवर आहेत. ज्यामुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला मोठ्या अडचणातून सामोरे जावे लागत आहे.

त्याच्या नावाने आणि चेहऱ्याचा वापर करून डीपफेक (Deepfake) तंत्रज्ञानाद्वारे काही अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ काही पॉर्न वेबसाइट्सवर झळकल्याचे उघड झाल्यानंतर चिरंजीवीने संताप व्यक्त केलाय. त्याने हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. अधिकऱ्यांनी सांगितलं की, ही तक्रार तेव्हा करण्यात आली, जेव्हा अनेक पोर्नोग्राफिक वेबसाईटवर त्यांचे अश्लील व्हिडिओ कंटेंट समोर आला. हे AI डीपफेक व्हिडिओज असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या तक्रारीत चिरंजीवी म्हणाला, आर्टिफिश‍ियल इंटेलिजेंस वापरून त्याचे डीपफेक पोर्नोग्राफिक व्हिडिओज अनेक अश्‍लील वेबसाईट्सवर प्रसारित करण्यात आले. कष्टातून मिळवलेली त्यांची प्रतिष्ठा, प्रतिमा मलीन करण्यात आलीय.

हा प्रकार सोशल मीडियावर उघड झाल्यानंतर चाहत्यांमध्येही संताप उसळला आहे. अनेकांनी या प्रकारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मेगास्‍टारने कंटेंट आणि वेबसाईट ब्‍लॉक करण्याची केली मागणी

चिरंजीवीने पोलिसांकडे हे फेक व्हिडिओ अपलोड करणे आणि प्रसारित करणे, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकचं नाही तर त्या वेबसाईट्स आणि इंटरनेटवरील कंटेंट तत्काळ ब्लॉक करण्याची आणि हटवण्याची मागणी देखील केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT