Me Honar Superstar Chhote Ustaad 4 Winner pudhari photo
मनोरंजन

Me Honar Superstar Chhote Ustaad 4 Winner : ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद-४’चा किताब शुभ्रा खाडेच्या नावावर; कोल्हापूरची कन्या ठरली स्टार

Me Honar Superstar Chhote Ustaad 4 Winner : कोल्हापूरची शुभ्रा खाडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ ची महाविजेती

स्वालिया न. शिकलगार

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद-४’ या लोकप्रिय गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला असून कोल्हापूरच्या शुभ्रा खाडेने विजेतेपद पटकावले आहे. आपल्या सुरेल आवाजाने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने शुभ्राने परीक्षकांसह प्रेक्षकांची मने जिंकली.

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद-४’ या लोकप्रिय मराठी गायन रिअॅलिटी शोचा बहुप्रतिक्षित महाअंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत कोल्हापूरच्या शुभ्रा खाडेने आपल्या अप्रतिम गायनकौशल्याच्या जोरावर विजेतेपद पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंतिम फेरीत तिने सादर केलेल्या सुरेल आणि भावपूर्ण गाण्यांनी परीक्षकांसह प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध केले. वीरा हाक्के, शुभ्रा खाडे, अस्मिता गादेकर, अर्णव बोपलकर, ईशानी हिंगे आणि गंधर्व चामनर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली.

शुभ्राने सुरुवातीपासूनच आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रत्येक फेरीत तिच्या सादरीकरणात प्रगल्भता आणि आत्मविश्वास दिसून आला. तिच्या आवाजातील गोडवा, सुरांची अचूकता आणि भावपूर्ण अभिव्यक्ती यामुळे ती स्पर्धेतील एक मजबूत दावेदार म्हणून ओळखली जात होती.

शुभ्रा खाडेला तीन लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. तर द्वितीय क्रमांक विजेती नांदेडच्या वीरा हाक्के ठरली. तृतीय क्रमांक नाशिकच्या अस्मिता गादेकर आणि ठाण्याचा अर्णव बोपलकर यांना विभागून देण्यात आला. तर पुण्याची ईशानी हिंगे आणि गंधर्व चामनर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं.

काय म्हणाली शुभ्रा खाडे?

शुभ्रा खाडे म्हणाली, ‘हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार आहेत. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या रुपात नव्या पाढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखील मी ऋणी आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT