Vijay Varma Matka King Teaser out  pudhari photo
मनोरंजन

Vijay Varma Matka King Teaser : नागराज मंजुळेंचा 'मटका किंग' येतोय! विजय वर्माच्या वाढदिवशी टीझर रिलीज; पाहा कधी होणार प्रदर्शित?

Vijay Varma Matka King Teaser : नागराज मंजुळेंचा 'मटका किंग' येतोय! विजय वर्माच्या वाढदिवशी टीझर रिलीज; पाहा कधी होणार प्रदर्शित?

स्वालिया न. शिकलगार

ज्येष्ठ अभिनेते विजय वर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राइम व्हिडिओने 'मटका किंग' या बहुप्रतीक्षित वेब सीरिजचा टीझर लॉन्च केला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून, ही कथा १९६० च्या दशकातील मुंबईतील एका व्यापाऱ्याभोवती फिरते, जो 'मटका' हा जुगाराचा खेळ सुरू करून संपूर्ण शहरावर राज्य करतो.

Vijay Varma Matka King Teaser out

विजय वर्माच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त (२९ मार्च २०२६) प्राइम व्हिडिओने चाहत्यांना 'मटका किंग'चा धमाकेदार टीझर शेअर करून मोठे सरप्राईज दिले आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने 'सैराट' फेम नागराज मंजुळे आणि विजय वर्मा ही तगडी जोडी पहिल्यांदाच एकत्र येत आहे. प्राईम व्हिडिओ, जो भारतातील सर्वात लोकप्रिय एंटरटेनमेंट डेस्टिनेशन आहे, त्याने आज विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त आगामी ओरिजिनल ड्रामा सीरिज ‘मटका किंग’ची वर्ल्डवाईड प्रीमियर डेट जाहीर केली आहे. अभय कोरन्ने यांनी लिहिलेली आणि नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित केलेली ही सीरिज १९६० च्या दशकातील बदलत्या मुंबईवर आधारित आहे. 

काय आहे मटका किंगची कथा?

‘मटका किंग’ची कथा ब्रिज भट्टीभोवती फिरते, ज्याची भूमिका विजय वर्मा यांनी साकारली आहे. १९६० च्या दशकातील बदलत्या बॉम्बेमध्ये स्वतःची ओळख आणि मान-सन्मान मिळवण्यासाठी झटणारा एक हुशार आणि मेहनती कापूस व्यापारी अशी त्याची व्यक्तिरेखा आहे. गर्दीने गजबजलेले बाजार, चाळी आणि बदलणारी सत्ता यांच्यात ही कथा उभी राहते.

नागराज मंजुळे यांनी या काळातील मुंबई, तेथील बाजारपेठा आणि चाळींचे जीवन अत्यंत जिवंतपणे पडद्यावर उतरवले आहे. कथा एका चतुर कापूस व्यापाऱ्याची (विजय वर्मा) आहे, जो मटका नावाचा जुगाराचा एक नवीन प्रकार सुरू करतो. हा खेळ इतका लोकप्रिय होतो की तो केवळ श्रीमंतांपुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग बनतो.

कधी रिलीज होणार?

‘मटका किंग’मध्ये विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवर मुख्य भूमिकांमध्ये आहेत. यांच्यासोबत विनीत कुमार सिंह, भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ही सीरिज सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, अश्विनी सिदवानी आणि आशीष आर्यन यांनी ‘रॉय कपूर फिल्म्स’, ‘आटपाट’ आणि ‘SMR प्रोडक्शन्स’च्या बॅनरखाली निर्मित केली आहे. या सीरिजचा वर्ल्ड प्रीमियर १७ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. भारतासह जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम होईल.

काही काळानंतर नागराज मंजुळे पुन्हा परतत आहेत. त्यांनी याआधी 'सैराट', 'फँड्री' आणि 'झुंड'चे दिग्दर्शन केले आहे. नाळ देखील त्यांच्या उत्तम कलाकृतीपैकी एक आहे. आता या ड्रामा सीरिजकडून प्रेक्षकांना आणि त्यांच्या फॅन्सना अपेक्षा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT