अडल्ट कॉमेडी प्रकारात मोडत असलेला मस्ती फ्रँचाइजीचा चौथा सिनेमा आता रिलिजसाठी सज्ज आहे. या सिनेमाचा टीजर नुकताच समोर आला आहे. रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय या त्रिकुटाची धमाल कॉमेडी या सिनेमात दिसणार आहे. या फ्रँचाइजीचा सगळ्यात पहिला सिनेमा २००४ मध्ये आला होता. त्यावेळी इंद्रकुमार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. मस्ती ४ च्या दिग्दर्शनाची जबादारी यावेळी इंद्रकुमार यांच्या ऐवजी मिलाप जव्हेरी यांच्या खांद्यावर आहे. या सिनेमाचे शूटिंग ४० दिवसात पूर्ण झाले युके इथे या सिनेमाचे बहुतांश शूटिंग झाले आहे. (Latest Entertainment News)
या सिनेमाचे आतापर्यंत तीन पार्ट आले असून तीनही पार्टनी खास असा प्रेक्षकवर्ग तयार केला. आता या सिनेमात पुन्हा एकदा तीन मित्र त्यांच्या हटके अंदाजात दिसणार आहेत. दरवेळीप्रमाणेच या पार्टमध्येही घरवाली आणि बाहरवाली यांच्यात अडकलेले तीन मित्र आणि त्यांची धमाल दिसणार आहे. या सिनेमाचा जॉनर ऍडल्ट कॉमेडी असल्याने यात विनोदासह हॉटनेसचाही भरपूर तडका असणार यात शंका नाही.
या सिनेमात रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत. या शिवाय या सिनेमात रुही सिंग, एलनाज नैरोजी आणि बिग बॉस 19 फेम नतालिया जानोसजेक हे कलाकार दिसत आहेत.
२००४ ला या फ्रँचाइजीची सुरुवात झाली. यानंतर २०१३ मध्ये ग्रेट ग्रँड मस्ती हा सिनेमा रिलीज झाला होता. आता ९ वर्षांनी या सिनेमाचा चौथा पार्ट रिलीज होतो आहे.
हा सिनेमा २१ सप्टेंबरला रिलीज होतो आहे