Mass Hero Suriya story  pudhari photo
मनोरंजन

Suriya Mass Hero | दाक्षिणात्य सूर्याचा सुपरस्टार 'मास स्ट्रोक', 'गजनी,' 'सिंघम,' 'जय भीम' अन्‌ आता 'करुप्पु'..

Suriya Mass Hero -‘गजनी’पासून ‘करुप्पू’पर्यंत! सूर्याचा बॉक्स ऑफिसवर पुन्हा ‘मास स्ट्रोक’

स्वालिया न. शिकलगार

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने गेल्या अनेक वर्षांत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘गजनी’, ‘सिंघम’ आणि ‘जय भीम’सारख्या चित्रपटांमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. आता त्याचा ‘करुप्पू’ हा आगामी चित्रपट चर्चेत असून सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Suriya Karuppu movie stardom blockbuster films in the Tamil industry

विजयच्या अभिनयातून संन्यासानंतर आता सूर्याला तमिळ सिनेमाचा पुढील सर्वात मोठा मास सुपरस्टार म्हटलं जात आहे. ‘गजनी’, ‘सिंघम’ आणि आता ‘करुप्पु’… सूर्याने पुन्हा एकजा सिद्ध केलं आहे की, तो केवळ शानदार अभिनेता नाही तर बॉक्स ऑफिस किंग देखील आहे. सूर्याचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘करुप्पु’ने बॉक्स ऑफिसवर कमाईचं वादळ आणलं आहे. त्यामुळे तमिळ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये नवा सुपरस्टार म्हणून सूर्याचं नाव पुढे आलं आहे. सूर्याच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीत ‘मास’ आणि ‘क्लास’ या दोन्ही प्रवाहांमध्ये सहज वावरणारे काहीच अभिनेते आहेत. त्यात आज सर्वात वरचं नाव घेतलं जातं ते म्हणजे सुर्या. अभिनय, अॅक्शन्स, आणि प्रेक्षकांचं प्रेम या सगळ्यांच्या जोरावर सूर्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता ‘थलपती’ विजय यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याच्या चर्चांदरम्यान तमिळ सिनेमाचा पुढचा ‘मास सुपरस्टार’ म्हणून सूर्याचं नाव सर्वाधिक पुढे येत आहे. ‘गजनी’, ‘सिंघम’, ‘जय भीम’ ते आता ‘करुप्पु’पर्यंत सूर्याने प्रत्येक टप्प्यावर स्वतःला नव्यानं सिद्ध केलं आहे.

संघर्षातून घडलेला अभिनेता

सूर्याचं खरं नाव सरवनन शिवकुमार. तो ज्येष्ठ अभिनेते Sivakumar यांचा मुलगा. घरात सिनेमाचं वातावरण असलं तरी सूर्याला सुरुवातीला अभिनयात रस नव्हता. तो एका गारमेंट कंपनीत ८ महिने नोकरी करत होता आणि स्वतःची ओळख वडिलांच्या नावाशिवाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला १००० रुपये महिना पगार मिळायचा. जेव्हा फॅक्टरीच्या मालकाला सत्य समजलं, तेव्हा सूर्याने काम सोडलं.

तो पद्म शेषाद्री बाला भवन आणि सेंट बेड्स एंग्लो इंडियन स्कूल (चेन्नई) तून शालेय शिक्षण तर लोयोला कॉलेज, चेन्नईतून बी.कॉमची पदवी घेतलीय. त्याचे वडील शिवकुमार तमिळ सिनेमातील एक दिग्गज अभिनेते आहेत.

सूर्याने २२ व्या वर्षी दिग्दर्शक वसंत यांच्य 'नेररुक्कू नेर' (१९९७) मधून डेब्यू केला होता. या चित्रपटाचे निर्माते मणि रत्नम होते. सुरुवातीच्या काही चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही. अभिनयात आत्मविश्वास नसल्याची टीकाही झाली. मात्र सूर्याने हार मानली नाही. शरीरयष्टी, डान्स, प्रभावी संवाद आणि अभिनयावर त्याने प्रचंड मेहनत घेतली.

नंदा, काक्क काक्क, गजनी, सिंघम, सिंघम २ आणि ३, अंजान यासारख्या चित्रपटातून आफली निर्माण केली. तीन तामिळनाडूचे राज्य फिल्म पुरस्कार आणि तीन फिल्मफेयर पुरस्कार त्याने जिंकले आहेत.

नंदा चित्रपटानने बदललं करिअर

दिग्दर्शक बाला यांच्या नंदा या चित्रपटाने सूर्याच्या करिअरला पहिला मोठा टर्निंग पॉईंट मिळाला. गंभीर आणि भावनिक भूमिकाही आपण ताकदीने करू शकतो, हे त्याने दाखवून दिलं. त्यानंतर ‘काखा काखा’मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका आणि ‘पिथामगन’मधील अभिनयाने तो चर्चेत आला. पुढे एकापेक्षा एक चित्रपटाने त्याला अस्सल अभिनेत्याचा टॅग मिळाला.

गजनी रिलीज झाल्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. हा चित्रपट २००५ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट इतका मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता की, त्यावर बॉलिवूडमध्ये गजनीच नावाने चित्रपट आला. ज्यामध्ये आमिर खान आणि अभिनेत्री असिनने मुख्य भूमिका साकारली होती. सूर्याचा ‘सिक्स पॅक लूक’ त्या काळात प्रचंड चर्चेत आला.

सिंघम - मास हिरो

२०१० मध्ये सिंघम चित्रपटानमुळे सूर्याला मास हिरोचा टॅग मिळाला. दबंग पोलिस अधिकारी दुरई सिंघमची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अॅक्शन, भन्नाट दृश्ये आणि सूर्याची एनर्जी यामुळे सिंघम सुपरहिट ठरला. त्यानंतर सिंघम २ आणि ३ देखील आला. पुढे जाऊन बॉलविड अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला सिंघमचा रिमेक बनला. या चित्रपटानंतर सूर्याचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला.

अभिनयाची दुसरी बाजू : जय भीम

जय भीम हा मूळच्या तमिळ चित्रपटात त्याने चंद्रू वकिलाची भूमिका साकारली होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. सूर्याने वयाची पंचेचाळीशी पार केलेली आहे. पन्नाशीकडे असताना देखील तो आजही यंग स्टार दिसतो. फक्त अॅक्शन स्टार म्हणून नव्हे तर विविध आशयघन चित्रपटांचा कलाकार म्हणून दाक्षिणात्य प्रेक्षकांचे त्याच्यावर अफाट प्रेम आहे.

विश्वासार्ह अभिनेता म्हणूनही सूर्याने स्वतःला सिद्ध केलं. Soorarai Pottru मध्ये सर्वसामान्य माणसासाठी स्वस्त विमानसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या उद्योजकाची भूमिका त्याने जिवंत केली. या चित्रपटासाठी त्याचं देशभर कौतुक झालं.

सूर्याचं खासगी जीवन

सूर्याने साऊथ अभिनेत्री ज्योतिकासोबत ११ सप्टेंबर, २००६ मध्ये लग्न केले होते. दोघांचे लग्न मोठ्या जल्लोषात झाले होते. सूर्या आणि ज्योतिकाने १९९९ मध्ये 'पूवेल्लम केत्तुप्पर' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांमध्ये अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. पुढे ते विवाहबद्ध झाले. सूर्या-ज्योतिकाला एक मुलगी दीया आणि मुलगा देव आहे.

आता ‘करुप्पु’ची चर्चा

सध्या सूर्याच्या आगामी करुप्पू चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. पोस्टरपासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता तर चित्रपटगृहात स्क्रिनवर करुप्पूसामीच्या भूमिकेत तो येताच शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट होतो आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, रग्गड लूक आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स पाहता हा चित्रपट पुन्हा एकदा सूर्याला 'मास सुपरस्टार स्ट्रोक' देण्यास सज्ज ठरू शकतो, असे म्हणावयास हरकत नाही.

विजयच्या नंतर सूर्याच का?

दुसरीकडे, तामिळनाडूच्या राजकारणात सिनेमाला अन्यसाधारण महत्त्व आहे. आधी अभिनय आणि नंतर राजकारणात प्रवेश अशी परंपराच जणू चालत आलीय, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तमिळ सिनेमात ‘मास’ हिरो होण्यासाठी केवळ बॉक्स ऑफिस पुरेसं नाही; त्यासाठी लोकांशी जपलेली भावनिकता महत्त्वाची आहे. सूर्याने आधीच मिळवलीय. दरम्यान, थलपती विजय सिनेमांपासून दूर झाल्यानंतर आता मास हिरो म्हणून सूर्याचेच नाव समोर आले आहे. त्याची प्रचंड लोकप्रियता पाहता तमिळ इंडस्ट्रीला सुपरस्टार सूर्याचा मास स्ट्रोक नक्कीच बसलाय, असे म्हणायला हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT