थोड तुझं थोडं माझं ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने नुकत्याच दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे. लपंडाव आणि नशीबवान या दोन नव्या मालिकांचे नाव आहे. नुकताच या दोन्ही मालिकांचा प्रोमो शेयर करण्यात आला आहे. या दोन्ही मालिकांपैकी लपंडाव ही मालिका 15 सप्टेंबर पासून दुपारी दोन वाजता प्रसारित होणार आहे. तर यासोबतच नवी असलेल्या नशीबवान मालिकेची अजून समोर आली नाही. (Latest Entertainment News)
पण यामध्ये एक मालिका बंद होणार असल्याची चर्चा आहे. थोडं तुझं थोडं माझं ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अगदी एक वर्षांपूर्वीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मागील वर्षी 17 जूनला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत शिवानी सुर्वे आणि समीर देशपांडे हे कलाकार दिसत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री शिवानी सुर्वेने बऱ्याच वर्षांनी टेलिव्हिजन विश्वात कमबॅक केले होते.
विशेष म्हणजे टीआरपीमध्ये ही मालिका नंबर वन होती. अशावेळी अचानक ही मालिका निरोप घेत असल्याचे समजताच चाहत्यांनी मात्र सोशल मिडियावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मालिका बंद होत असल्याची अधिकृत घोषणा चॅनेलने केली नाही. पण सोशल मिडियावरील अनेक फॅनपेजवर ही बातमी दिसते आहे. अनेकांनी या मालिकेच्या ऑफ एयर जाण्याबाबत नाराजी दाखवत स्लॉट चेंज करा पण मालिका संपवू नका अशी मागणी केली होती.