बावरे प्रेम हे चित्रपट Instagram
मनोरंजन

मराठी ओटीटीवर देशी-विदेशी चित्रपटांचा महाराष्ट्रीयन तडका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षकांना मराठीत डब केलेल्या हॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर्ससह अनेक भाषांमधील सुपरहिट चित्रपटांकडे पाहता येणार आहेत. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटने 'अल्ट्रा झकास फ्रायडेस' अंतर्गत अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रेक्षकांसाठी हे चित्रपट आणले आहेत. दर शुक्रवारी, देशी-विदेशी चित्रपट मराठी भाषेत पाहता येणार आहेत.

बावरे प्रेम हे मराठी भाषेतून पाहता येणार

बावरे प्रेम हे

“बावरे प्रेम हे” ह्या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, उर्मिला कोठारे आणि विद्याधर जोशी यांची अप्रतिम स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी केले आहे. नील त्याच्या मित्रांसोबत गोवा ट्रीपला जातो. जिथे त्याचा अनन्या नावाच्या मुलीशी वाद होतो. पुन्हा जेव्हा त्याची भेट अनन्याशी होते तेव्हा तो माफी मागतो. पण त्या बदल्यात ती नीलकडे तिचं हरवलेल पुस्तक शोधून देण्याची मदत मागते. मदत केल्यानंतर रोज भेटून ऐकत्र फिरत असताना नीलच्या मनात अनन्याबद्दल भावना निर्माण होतात. नीलच्या मनात प्रेमाची भावना आहे हे समजल्यावर अनन्या त्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल का? हे चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.

घिल्ली (धडाकेबाज घिल्ली)

साऊथचा मेगास्टार विजय थलापती आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा तमिळ चित्रपट घिल्लीने बॉक्स ऑफिसवर त्याच्या ॲक्शन, रोमान्स आणि गाण्यांसह प्रचंड यश मिळवले होते. तसेच आता प्रेक्षकांना चित्रपट मराठीमध्ये पाहण्याचा आनंद घेता येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन धरणी यांनी केले असून ही कथा वेलू या महत्त्वाकांक्षी कबड्डीपटूची आहे जो प्रादेशिक कबड्डी खेळात भाग घेण्यासाठी मदुराईला आला होता. जिथे तो धनलक्ष्मीला तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्या माणसापासून वाचवतो.

गन्स ट्रान्स ॲक्शन

तेलुगू चित्रपट गन्स ट्रान्स ॲक्शन स्टारर चैतन्य पासुपुलेती, हीना राय आणि सुदर्शन आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक सिद्धांत यांनी केले आहे. या चित्रपटातील पात्रांची रचना GTA या अतिशय प्रसिद्ध गेमच्या आधारे करण्यात आली आहे.

क्लिअरिंग (बापमाणूस)

डेव्हिड मॅटालॉन यांचा हॉलीवूड चित्रपट द क्लिअरिंग म्हणजेच बापमाणूस चित्रपटाची कथा वडील आणि त्याचा मुलीबद्दल आहे. ते कॅम्पिंग ट्रिपला गेले असतात आणि तिथे त्याला झोम्बी सर्वनाशाचा सामना करून आपल्या बेपत्ता झालेल्या मुलीला शोधायच असतं. तो स्वतः सोबत त्याच्या मुलीला वाचवण्यात यशस्वी होईल का? हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहता येईल.

मराठी ओटीटीवर या दिवसापासून सुरुवात...

५ जुलै २०२४ रोजी घिल्ली (धडकेबाज), बावरे प्रेम हे १२ जुलै २०२४, गन्स ट्रान्स ॲक्शन १९ जुलै २०२४ रोजी, आणि द क्लिअरिंग २६ जुलै, २०२४ रोजी पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT