मनोरंजन

Tejashree Pradhan : हं हं..गुलाबी साडी नव्हे…गुलाबी ड्रेसमध्ये लई भारी तेजश्री प्रधान

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेत सागर आणि मुक्ता कोळी यांच्या क्यूट जोडीला कोण बंर ओळखतं नाही. सागर म्हणजे, अभिनेता राज हंचनाळे याने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत भारदस्त अभिनय साकारलाय. तर मुक्ता कोळी म्हणजे, मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान होय. सालस, गोड, मनमिळावू, समजूतदार अशी भूमिका तेजश्री उत्तररित्या निभावली. सध्या तेजश्री सोशल मीडियावर सक्रिय होत हटके फोटोशूट केलं आहे. तिच्या एक झलक पाहण्यास चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान नुकतेच इन्स्टाग्रामवर बेबी पिंक कलरच्या (गुलाबी) चुडीदार ड्रेसमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केलं आहेत. यातील तिच्या सौंदर्यसोबत हटके वेगवेगळ्या अदांनी चारचाँद लावलेत. जंगलाच्या मधोमध तेजश्रीने हे फोटोशूट केलं आहे. यावेळी खास करून साधी, निरागस दिसणाऱ्या तेजश्रीचे भरभरून कौतुक झाले.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने "Beautiful things don't ask for attention. #HappyLife" लिहिले आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात झुमके, हातात अंगठी- ब्रेसलेट, कपाळावर टिकली, मेकअप आणि लिपस्टिने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. हे फोटो आमि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.

'Kitti goad ga Teju', 'Hey gorgeous 😍', 'काय करायचं या मुलीचं, इतकं गोड कसं कोणी असू शकतं..', 'खूपच निरागस आणि गोड… यालाच म्हणतात नैसर्गिक सुंदर..😍काहीही करायची गरज नाही ❤️🥰'always favourite', 'How could anyone look soo pretty', 'काय बोलणार आता! जे बोलायचं होतं ते तर गाण्यामध्येच आहे', 'परम सुंदरी', 'Kharach khup khup chan', 'Very nice pics', 'Sundar ❤️', 'ई गं,,,,,,,,, किती सुंदर आहे yarrrrr❤️😍 खूप प्रेम @tejashripradhan तुम्हाला', 'Pretyyyyy….', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे इमोजीं शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यत ८५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. याशिवाय तेजश्रीचा २ जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यानंतर चाहत्यांनी तिला उंदड आयुष्यासाठी भरभरून आशिर्वाद दिलं आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT