Aditi Sarangdhar entry in muramba tv serial  Instagram
मनोरंजन

Muramba Serial Update | मुरांबा मालिकेत अभिनेत्री अदिती सारंगधरची होणार एन्ट्री

Aditi Sarangdhar | इरावती मुकादम हे पात्र अभिनेत्री अदिती सारंगधर साकारणार आहे

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत लवकरच नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. इरावती मुकादम असं या व्यक्तिरेखेचं नाव असून अभिनेत्री अदिती सारंगधर इरावती हे पात्र साकारणार आहे. इरावती परदेशात अनेक वर्षे राहून आता मुकादम कुटुंबात पाऊल ठेवतेय. डावपेच करण्यात हुशार असणाऱ्या इरावतीला रमाची जागा रमासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या माहीने घ्यायला हवी असं वाटतंय आणि त्याच मनसुब्याने ती मुकादमांच्या घरी आलीय. इरावतीचा प्लॅन यशस्वी होणार का? तिच्या आगमनाने मुकादम कुटुंबात काय वादळ उठणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना अदिती सारंगधर म्हणाल्या, ‘मुरांबा मालिकेने नुकतेच एक हजार भाग पूर्ण केले. हजारचा टप्पा गाठल्यानंतर अतिशय उत्कंठावर्धक वळणावर मला एका चांगल्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अश्या पद्धतीची भूमिका मी याआधी केलेली नाही. मी पहिल्यांदा मेडिटेशन हीलरच्या रुपात दिसणार आहे.

एका छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येताना खूप आनंद होतोय. मालिकेत अशा वळणावर इरावती पात्राची एण्ट्री होतेय जिथे खरं काय आणि खोटं काय याची पारख करण्यात संपूर्ण मुकादम कुटुंब गुंतलं आहे. इरावतीच्या एण्ट्रीने ही गुंतागुंत वाढणार की कमी होणार यासाठी नक्की पहा मुरांबा दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT