Manoj Bajpayee main lead in upcoming movie Governor Instagram
मनोरंजन

Manoj Bajpayee | विपुल शाह-चिन्मय मांडलेकरच्या चित्रपटात मनोज बाजपेयी, ‘गव्हर्नर’च्या राजकारणाची चर्चा

Manoj Bajpayee movie Governor | विपुल शाह आणि दिग्दर्शित ‘गव्हर्नर’ या राजकारणावर आधारित चित्रपटात अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिका साकारणार आहे

स्वालिया न. शिकलगार

मुंबई -निर्माते विपुल शाह एक उत्तम प्रोजेक्ट घेऊन आहेत, ज्याचं नाव असेल-गव्हर्नर. यामध्ये अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक उत्कंठावर्धक राजकीय थ्रिलर असणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं शूटिंग ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केले आहे. निर्मिती विपुल शाह आणि सहनिर्माते आशीन ए. शाह यांच्या 'सनशाईन पिक्चर्स' बॅनरखाली होणार आहे.

गव्हर्नर हा चित्रपट एका माजी राज्यपालाच्या जीवनावर आधारित आहे. या राज्यपालांचं निधन मागील वर्षी झालं असून, त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन ही कथा मांडली जाणार आहे. सध्या स्क्रिप्टशी संबंधित कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असल्याने निर्माते अधिक माहिती गुप्त ठेवत आहेत.

या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर ऑगस्टमध्ये मुंबईसह आणखी दोन शहरांमध्ये सुमारे ४० दिवसांचं शूटिंग पूर्ण करणार आहेत. ‘गव्हर्नर’ची मूळ संकल्पना विपुल अमृतलाल शाह यांनी विकसित केली असून, त्यानंतर त्यांनी सुवेंदू भट्टाचार्य, सौरभ भारत आणि रवी असरानी यांच्यासोबत मिळून या चित्रपटाच्या पटकथेवर काम केलं आहे. मनोज बाजपेयी आणि विपुल शाह यांची ही पहिलीच जोडी असून, त्यांच्या या सहकार्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

एकीकडे गव्हर्नरच्या तयारीत शाह बिझी आहेत. तसेच ते लवकरच त्यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या हिसाब या हाईस्ट थ्रिलर चित्रपटावरही काम करत आहेत. ज्यात जयदीप अहलावत आणि शेफाली शाह मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हिसाब २०२५ च्या उत्तरार्धात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देखील सनशाईन पिक्चर्स आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार होत आहे.

गव्हर्नर आणि हिसाब या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून विपुल अमृतलाल शाह पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आशयघन आणि दमदार कथा घेऊन येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT