' द फॅमिली मॅन' ही सिरिज ओटीटीच्या लोकप्रिय सिरिजपैकी एक आहे. याचे दोन्ही सीझन अत्यंत लोकप्रिय ठरले. आता या सीझनचा तिसरा भाग येऊ घातला आहे. 21 नोव्हेंबरला तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी श्रीकांत तिवारी या आपल्या आयकॉनिक अवतारात दिसतो आहे. (Latest Entertainment News)
या सिरिजमध्ये 'पाताल लोक' फेम जयदीप अहलावत आणि अभिनेत्री निमरत कौर हे या सिरिजमध्ये निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहेत. या सिरिजचा हुकमी एक्का श्रीकांत तिवारीने त्याचे अभिनयाचे नाणे तिन्ही सिरिजमध्ये खणखणीत वाजवले आहे. अर्थात या सिरिजसाठी मनोज वायपेयीने मानधनही तितकेच तगडे घेतले आहे. जाणून घेऊया त्याविषयी.
गुप्तहेर असलेल्या श्रीकांत तिवारीच्या व्यक्तिरेखेसाठी मनोज वायपेयी यांनी जवळपास 20.20 ते 22.25 कोटी रुपये इतके मानधन आकारल्याचे समोर येत आहे. जयदीप अहलावत या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. रुक्मा असे त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव आहे.
या सिरिजसाठी त्याने जवळपास 9 कोटींचे मानधन घेतले आहे. त्यासोबतच दसवी फेल फेम अभिनेत्री निमरत कौरही दिसते आहे. तिलाही जयदीपप्रमाणेच 8-9 कोटींचे मानधन मिळाले आहे.
या सिरिजमध्ये सूची म्हणजेच श्रीकांतची पत्नी साकारत असलेली प्रियमणी हिला 7 कोटींचे मानधन मिळाले आहे.