मुंबई : मराठी चित्रपट ‘मनाचे श्लोक’ हा शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. पण पुणे, नगर येथे हा चित्रपट बंद पाडण्यात आला आहे. मृण्मयी देशपांडे हीने हा चित्रपट दिग्दर्शत केला आहे. धायरी, कोथरुड येथील चित्रपट बंद पाडण्यात आला. पण आता गौतमी देशपांडे हिने पुढील गुरुवारी 16 ऑक्टोबरला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार असल्याचे इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन पश्चिम महाराष्ट्र, पुणे, संभाजीनगर येथे ज्या घटना घडल्या आहेत. त्या दुखःद आहेत. त्यामुळे सध्या या चित्रपटाचे प्रदर्शन आम्ही थांबवत आहोत.असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. गौतमी ही मृण्मयीची बहीण आहे.
हा चित्रपट नावापासूनच वादात सापडला होता. ‘मनाचे श्लोक’ या नावाला अनेकांचा विरोध होता. संत रामदास लिखीत मनाचे श्लोक या ग्रंथाचे नाव आहे. त्यामुळे वादंग झाला होता. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून याला विरोध सुरु झाला आहे. आता कोथरुड, धायरी भागात या चित्रपटाचे खेळ बंद पाडण्यात आले आहेत. उज्ज्वला गौड या महिलेने हा चित्रपट बंद पाडला अशी प्राथमिक माहिती आहे. ही महिला हिंदू संघटनेशी संबधित आहे असे कळते.
दरम्यान हिंदू संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शविला होता. हिंदूच्या श्रद्धेचा बाजार मांडला जात आहे असे आरोप केले होते तसेच. हिंदू जनजागृती समितीने आक्षेप घेतला होता. धार्मिक ग्रंथाचे नाव व्यावसाईक लाभ व मनोरंजनासाठी करणे चुकीचे आहे. तसेच चित्रपटज्ञचे प्रदर्शन रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण न्यायालयाने ती फेटाळली.