पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता निर्मल बेनीच्या निधनाने मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी त्याचे हार्ट अॅटॅक ने निधन झाले. Nirmal Benny च्या मृत्यूचे वृत्त त्याचा जवळचा मित्र आणि निर्माता संजय पडियूरने दिली आहे. त्याने सोशल मीडियावर माहिती दिली.
संजयने फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मार्मिक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये निर्मल बेनीच्या निधनाची माहिती दिली. संजयने लिहिलं, 'माझ्या प्रेमळ मित्राला अलविदा म्हणत आहे...'आमीन' मध्ये कोचाचनची भूमिका आणि माझ्या 'दूरम'मध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आज सकाळी हार्ट ॲटॅकने निधन झाले. ईश्वराकडे प्रार्थना आहे की, माझ्या प्रिय मित्राच्या आत्म्याला शांती मिळो.'
निर्मल बेनी एक प्रतिभावान अभिनेता होता. 'आमीन'मधील कोचाचनची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. २०१२ मध्ये त्याने आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. केवळ ५ चित्रपट तो करू शकला.