Malamaal Weekly-2 new updates  instagram
मनोरंजन

Malamaal Weekly-2 |'मालामाल वीकली'चा सीक्वेल येतोय, रितेश देशमुख, परेश रावल, राजपाल यादव हास्याचा पाऊस पडणार

Malamaal Weekly-2 | 'मालामाल वीकली'चा सीक्वेल येतोय, रितेश देशमुख, परेश रावल, राजपाल यादव करणार कॉमेडीचा कल्ला

स्वालिया न. शिकलगार

‘मालामाल वीकली’ या लोकप्रिय कॉमेडी चित्रपटाचा सीक्वेल लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. ‘मालामाल वीकली २’मध्ये रितेश देशमुख, परेश रावल आणि राजपाल यादव यांची तगडी कॉमिक तिकडी पुन्हा एकत्र येणार असून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची तयारी सुरू आहे.

Malamaal Weekly sequel updtes

बॉलिवूडमधील सुपरहिट कॉमेडी चित्रपट ‘मालामाल वीकली’चा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. २००६साली प्रदर्शित झालेल्या Malamaal Weekly या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. आता ‘मालामाल वीकली २’च्या माध्यमातून पुन्हा एकदा हास्याचा तडका देण्याची तयारी सुरू असल्याचं समजत आहे.

हेरा फेरी ३, गोलमाल ५, जवानी तो इश्क होना है, वेलकम टू द जंगल, धमाल ४, भागम भाग २, या आगामी चित्रपटांमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडलीय ती म्हमजे मालामाल वीकलीचा सीक्वल. रिपोर्टनुसार, मालमाल वीकली हा चित्रपट हिट ठरला होता. आता या चित्रपटाचा सीक्वल येणार असून निर्माते त्यावर काम करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, “मालामाल वीकली २ वर काम सुरु आहे. चित्रपटाच्या टीमला एका चांगील कल्पना सुचली आहे, जी दुसऱ्या भागासाठी अगदी परफेक्ट आहे. यावेळी भूमिका आणि सेटिंग वेगळे असतील. पण पहिल्या भागाप्रमाणे हे काही लोकांच्या ग्रुपसाठी असेल. हव्यास असणाऱ्या गावातील लोक खूप पैसे मिळवण्यासाठी जे भरपूर पैसे मिळविण्यासाठी वेड्यासारखे प्रयत्न करतात.”

“परेश रावल, रितेश देशमुख आणि राजपाल यांदव यांना ॲप्रोज करण्यात आले आहे. पहिल्या भागातही या त्रिकुटांनी धुमाकूळ घातला होता, पण अद्याप या भूमिकांसाठी सही केली नसल्याचे समजते.

(video- feelwithinframe insta वरून साभार )

रितेश देशमुख, परेश रावल, राजपाल यादव यांचा मालामाल वीकली हा चित्रपट २० वर्षांपूर्वी मार्च २००६ मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटात रीमा सेन, शक्ती कपूर, सुधा चंद्रन, असरानी, ​​रसिका जोशी आदींच्या भूमिका होत्या. प्रियदर्शन यांची दिग्दर्शन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT