पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या खासगी आयुष्यमुळे चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. आता मलायका चर्चेत आली आहे, त्याला विशेष कारण आहे. मलायकाने खान कुटुबियांसोबत पॅचअप केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
मलायकाने नुकतेच तिचे नवे रेस्टॉरंट खोलले आहे. लेक अरहानसोबत मिळून मलायकाने रेस्टॉरंट सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे. दोघांच्या या रेस्टॉरंटला खान कुटुंबीयांनी भेट दिली आहे. सलीम खान, सलमा खानसोबत अरबाजही मलायकाच्या या रेस्टॉरंटमध्ये गेला होता.
मलायकान १९९८ मध्ये अरबाजशी लग्नगाठ बांधली होती, सुमारे १९ वर्षाच्या सुखी संसारानंतर मलायका आणि अरबाज घटस्फोट घेत एकमेकांपासून विभक्त झाले होते. त्यांना अरहान हा मुलगा आहे. अरबाजशी घटस्फोट झाल्यानंतर मलायका ही अर्जुनसोबत नात्यात होती.