Malaika Arora : अर्जुनच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोरा दिसली मिस्ट्रीमॅनसोबत
पुढारी ऑनलाईन डेस्क : मलायका अरोरा ही नेहमीच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून ती अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले आहे. 'सिघम अगेन' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने सिंगल असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मलायकाचा आता एका दुसऱ्या व्यक्तीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून मलायका तिचे अर्जुनसोबतचे ब्रेकअपचे दुःख विसरले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
व्हिडीओमध्ये तिच्यासोबत दिसणारा 'मिस्ट्री मॅन' कोण, हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांची उत्सुकता ताणाली आहे. व्हिडीओमध्ये मलायका तिची बहीण अमृता अरोरासोबत बाहेर फिरायला गेल्याचे दिसत आहे. पण, त्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते एका मिस्ट्रीमँनने. तो व्हिडीओत मलायकाचे हात आपल्या हातात घेऊन चालत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे मलायका एका व्यक्तीलाच डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यानंतर तो मलायकाचा मित्र किंवा प्रोफेशनल पार्टनर असू शकतो, असा अंदाजही वर्तविला जात आहे. मलायकाने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करत आपल्या नात्याबाबत भाष्य केले; पण त्यातून काहीच समोर आलेले नाही,

